
घराची सजावट ही फक्त घर सुंदर बनवण्यासाठी नसते, तर त्यामुळे तुमचं मनही फ्रेश होत असतं. सजावट ही महाग वस्तूच वापरून होते असं काही नाही. अनेक स्वस्त वस्तू कल्पकपणे वापरून घर छान सजवता येतं. घरात प्रवेश करताना आपण निसर्गाच्या एका मुक्त कोपऱ्यात प्रवेश करतो असा ‘फील’ देणारं घर असेल तर मन आणखी प्रसन्न होतं. घराची सजावट करताना जर आपण पर्यावरणास अनुकूल सामग्री आणि पद्धती वापरल्या, तर आपण निसर्गाचे रक्षण करू शकतो. ‘ग्रीन डेकोरेशन’ हा एक ट्रेंड असून तो आरोग्यासाठीही चांगला आहे. छोट्या छोट्या गोष्टींद्वारे घराला पर्यावरणपूरक कसं बनवायचं याबाबत काही खास कानमंत्र बघू.