Gudhi Padwa 2023 : गुढीला साडी कशी नेसवावी? जाणून घ्या कोणत्या साडीचा असतो मान

गुढीला हीच सा़डी नेसवा, त्यामागे आहे आध्यात्मिक कारण
Gudhi Padwa 2023
Gudhi Padwa 2023esakal

हिंदू नववर्षाचा पहिला दिन म्हणजे चैत्र पाडवा. उद्या गुढीपाडव्याला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी मोठ्या उत्साहात गुढी उभारली जाते. गुढीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो. येणारं वर्ष सर्वांसाठी सुख समाधानाचं जाऊदेत अशी प्रार्थना केली जाते.

कटपीसची साडी
कटपीसची साडीesakal

गुढी ही तेजाचं, उत्कर्षाच प्रतिक असते. त्यामूळे दारात गुढी उभारताना कोणी कोणत्या रंगाची, डिझाईनची साडी नेसवली आहे?, हे पाहिले जाते. गुढी उभी करताना बऱ्याचदा साडीच्या ओझ्यामूळे ती ताठ उभी राहत नाही. किंवा साडीची एक बाजू अशीच निसटून खाली येते. त्यामूळे गुढीला कोणती साडी नेसवावी, ती नेसवण्याची सोप्पी पद्धत कोणती हे आज पाहुयात.

साडी कोणती निवडावी

सध्या बाजारात काठ पदर साड्यांचा ट्रेंड कमी झाला आहे. त्यातल्या त्यात खण साडी नेसवणे कधीही चांगले. कारण,कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणूका, तुळजापूरची तुळजा भवानी माता यांच्या दर्शनाला गेल्यावर. खणाचे ब्लाऊज पिस आणि खणाच्याच साड्या देवीला अर्पण केल्या जातात.

खण साडीला विशेष महत्त्व आहे
खण साडीला विशेष महत्त्व आहेesakal

गुढी ही देवीचेच प्रतिक आहे. तिच्या आशिर्वादानेच घरात भरभराट होते, त्यामूळे गुढीला साडी निवडताना ती नवी आणि खणाची असावी. खण साडी घेणे शक्य नसल्यास  ती काठपदराची आणि वजनाला हलकी असावी, जेणेकरून गुढीच्या काठीला तिचं वजन पेलवेल.

Gudhi Padwa 2023
Hindu Culture : लग्नात नवरीला उलटं मंगळसूत्र का घालतात? जाणून घ्या मंगळसूत्राचं महत्व

गुढीला साडी कशी नेसवावी?

पहिली पद्धत आहे जी तूम्ही इतके वर्ष फॉलो करताय ती. तूम्ही साडी नेसताना पदर आणि समोरील बाजूच्या प्लेट पाडता. तशाच संपूर्ण साडीच्या प्लेट पाडून घ्या. एका बाजूच्या प्लेट एकत्र बांधाव्यात. आणि काठीच्या बारीक टोकालाही साडी घट्ट बांधावी. 

रेग्युलर स्टाईल गुढीची साडी
रेग्युलर स्टाईल गुढीची साडीesakal
Gudhi Padwa 2023
Intresting Fact : भारतात डाव्या तर अमेरिकेत उजव्या बाजूने गाडी का चालवतात लोकं? त्यामागे आहे हे विशेष कारण

दुसरी पद्धत खण किंवा काठाचा ब्लाऊज कटपीस घ्या. जो रेग्युलर ब्लाऊज पीस पेक्षा तीनपट मोठा असेल. कटपीस घेऊन तो त्रिकोणी आकारात दुमडून घ्या. किंवा कापून घ्या. त्रिकोणी आकारातील कटपीसच्या प्लेट पाडून घ्या.

कटपीसची शेवटची प्लेट मोठी व पहिली प्लेट लहान आकारातील असेल. जी आकर्षक वाटेल. या सर्व प्लेट तूम्ही काळजीपूर्वक पिनअप करा. किंवा त्याला टिप मारून घ्या. टिप मारताना त्याला एक नॉटही तूम्ही जोडू शकता. ज्यामूळे ती काठीला फिट बांधता येईल.

Gudhi Padwa 2023
Gudi Padwa 2023 : या वर्षी गुढीपाडव्याला मॉर्डन लुक हवाये? तर नक्की वाचा.

सहावारी साडीची तिसरी पद्धत आहे. यामध्ये संपूर्ण साडीचे प्लेट न करता अर्ध्या साडीचे प्लेट करावे. आणि पदराकडील भाग तसाच राहू द्यावा. आता ज्या प्लेट केल्या आहेत त्याला काठीला बांधून घ्या. काठीला कलश अडकवून लिंब, साखरमाळ, हार घालून घ्यावेत.

आता त्या उरलेल्या साडीचे प्लेट करून ते कलशाच्या वरून घ्या. कलशावर साडी डबलस्टीकने चिटकवता येईल. ज्यामूळे देवीने डोक्यावर पदर घेतला आहे, असेच चित्र दिसेल.   

Gudhi Padwa 2023
Gudi Padwa : गुढी उभारताना कलश उलटा का ठेवतात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com