Gudi Padawa Decoration Idea: गुढीपाडव्याला 'अशी' करा सुंदर सजावट, घराला मिळेल आकर्षक लूक

गुढीपाडव्यानिमित्त घराची खास सजावट करायची असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.
Gudi Padawa Decoration Idea:
Gudi Padawa Decoration Idea: Sakal

gudi padawa 2024 how to decorate home for gudi padawa festival

महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा मुख्यतः चैत्र नवरात्रीच्या प्रतिपदेपासून साजरा केला जातो. या खास प्रसंगी महिला विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. एवढेच नाही तर गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घर स्वच्छ करतात आणि मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढतात. आंब्याच्या पानांपासून तोरण बनवून प्रवेशदारावर लावतात. तुम्हालाही यंदाच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमचे घर अनोख्या पद्धतीने सजवायचे असेल, तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.

  • रंगीबेरंगी फुलांची सजावट

गुढीपाडव्यानिमित्त घर सुंदर पद्धतीने सजवण्यासाठी फुलांची मदत घेऊ शकता. रंगीत फुलांचा वापर करून तुम्ही आकर्षक सजावट करू शकता. घरातील कॉर्नरमध्ये सुगंधी आणि रंगीत फुल ठेऊ शकता. तसेच घरातील दारांवर फुलांच्या माळा लावू शकता.

  • तोरण

गुढीपाडव्याच्या निमित्ताने घर आकर्षक पद्धतीने सजवायचे असेल तर प्रत्येक खोलीच्या दारावर तोरण लावू शकता. यासाठी झेंडुचे फुल किंवा आंब्याच्या पानांचा वापर करू शकता. तोरण लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याशिवाय तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवरचे तोरण बाजारात मिळतील.

Gudi Padawa Decoration Idea:
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्यानिमित्त परिधान करा खास साड्या, 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स, दिसाल एकदम झकास!
  • मंदिराची सजावट

गुढीपाडव्यानिमित्त मंदिराची सजावट करू शकता. या शुभ मुहुर्तावर मंदिर स्वच्छ करून सुगंधी फुलांनी सजवू शकता. फुलांनी रांगोळी डिझाईन करूनही तुम्ही मूर्ती सजवू शकता. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या फुलांचे हारही मंदिरावर टाकू शकता.

  • सुंदर रांगोळी

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही रांगोळ काढून घराचे सौंदर्य वाढवू शकता. विविध रंगानी किंवा फुलांची सुंदर रांगोळी काढू शकता. यासाठी झेंडू आणि गुलाबाच्या फुलांचा वापर करू शकता. गुढीपाडवा रांगोळीच्या अनेक डिझाईन्स तुम्हाला नेटवर मिळतील.

  • वॉल पिस लावू शकता

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरात वॉल पिस लावू शकता. तुम्ही हाताने सुंदर गुडीपाडव्याचे वॉलपिस बनवू शकता किंवा बाजारात अनेक विविध वॉलपिस मिळतात. यामुळे घराला आकर्षक लूक मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com