Gudi Padwa 2024 : आनंदाचा सण गुढीपाडवा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Marathi New Year : हिंदू पंचांगानुसार, भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो.
Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024esakal

Gudi Padwa 2024 : महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2024) सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाला सुरूवात होते. हिंदू पंचांगानुसार, भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. आज हा गुढीपाडवा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात जणू जल्लोषच असतो. ढोल ताशांच्या मिरवणूका, मराठमोळ्या थाटात फेटे घालून निघणारी शोभायात्रा, रांगोळ्या अशी बरीच धामधूम सगळीकडे असते. गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो. मोठ्या आनंदाने मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. आज आपण गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्व काय? ते जाणून घेणार आहोत. (Gudi Padwa 2024 Know date, shubh muhrat, rituals and more about Marathi New Year)

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त

यंदा देशात ९ एप्रिलला (मंगळवारी) गुढीपाडव्याचा सण सगळीकडे साजरा केला जाईल. या दिवशी घरोघरी गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिलला (सोमवारी) रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होणार आहे. ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी ९ एप्रिलला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी समाप्त होणार आहे.

त्यामुळे, यंदा गुढीपाडव्याचा सण हा ९ एप्रिलला (मंगळवारी) साजरा होणार आहे. मंगळवारी ९ तारखेला सकाळी ६ वाजून २ मिनिटे ते १० वाजून १७ मिनिटांपर्यंत पुजेचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकता. (Gudi Padwa 2024 shubh Muhurt)

गुढीपाडव्याचे महत्व

महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजी केली जाते आणि दिमाखात गुढी उभारली जाते. या गुढीच्या जवळ रांगोळी काढली जाते. गुढीला फुलांचा हार आणि साखरेची गाठ वाहिली जाते. गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजे ध्वज असतो आणि प्रतिपदेच्या तिथीला मराठीमध्ये पाडवा असे म्हटले जाते.

त्यामुळे, या पर्वाला किंवा या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. त्यामुळे, या तिथीला आणि सणाला विशेष असे महत्व आहे. (Importance Of Gudi Padwa)

गुढीची पूजा कशी करावी?

 • गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे.

 • स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि देवाची पूजा करून प्रार्थना करावी.

 • ज्या जागेवर गुढी उभारायची आहे, ती जागा स्वच्छ करावी. घर स्वच्छ करावे.

 • गुढी उभारण्याच्या जागेवर रांगोळी काढावी, घर फुलांच्या माळेने सजवावे.

 • घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे आणि फुलांचे तोरण बांधावे.

 • गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा काठी स्वच्छ करून घ्यावी.

 • त्यावर हळदी-कुंकू लावून घ्यावे. आता एका कलशावर हळदी-कुकंवाच्या मदतीने स्वास्तिक काढावे.

 • त्यावर आता रेशमी कापड गुंडाळावे. त्यावर फुलांचा हार, साखरेची गाठी लावावी आणि कडुनिंबाचा पाला गुंडाळावा.

 • त्यानंतर, हळदी-कुंकू,अक्षता वाहून गुढीची पूजा करावी. अगरबत्ती, धूप लावावे. त्यानंतर, नारळ फोडावा.

 • गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

 • उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंब खाण्याची ही परंपरा आहे. (How to perform puja of Gudhi?)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com