esakal | आता खाण्यासाठी नाही, तर केसांना वापरा मेयोनीज; जाणून घ्या फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

मेयोनीज

आता खाण्यासाठी नाही, तर केसांना वापरा मेयोनीज; जाणून घ्या फायदे

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

केस खुप कुरळी झालेत, गुंता खुपच होतेय, मऊपणा अजिबात नाही. अशावेळी आपण शाम्पू, कंडीशनर, मास्कचा वापर करतो. यातून जर फरक नाही जाणवला तर परत वेगळा प्रयोग करायला सुरुवात करतो. तुम्ही कधी मेयोनिज वापरले आहे का? मेयोनिज चा वापर खाद्यपदार्धात केला जातो. विशेषता पास्ता,सॅडविजमध्ये मेयोनिज वापरतात. परदेशात मेयोनिज चा वापर जास्त करतात. याचा खाण्यासोबत केसांना ही चांगला फायदा होतो. मेयोनिजमध्ये अंड्याचा वापर केला जातो. जे प्रोटीनयुक्त असते. शिवाय यात व्हेजेटेबल आॅईल, सिरका असते. ज्यामुळे केसांचे पोषण तर होतेच शिवाय केसांना निरोगी ठेवण्यास मदत होते.काय आहेत याचे फायदे आणि कसे वापरावे मेयोनिज जाणून घेऊया...

मेयोनीज हेअर मास्क

मेयोनीज हेअर मास्क लावण्य़ापूर्वी केस ओले करुन घ्या. यानंतर मास्क लावून ५ मिनिट केसांना मसाज द्या.त्यानंतर कंगव्याने केस मोकळे करुन घ्या. यानंतर शाॅवर कॅप लावून २० मिनिटे ठेवा. आता शाम्पू ने केस स्वच्छ धुऊन घ्या.

मेयोनीज लावण्याचे फायदे

डँड्रफ पासून सुटका

डँड्रफच्या समस्या दूर करण्यासाठी मेयोनीज वापरू शकता. तुमच्या स्काल्पवर असणाऱ्या बॅक्टरिया घालवण्यासाठी हे मदत करते. ज्यामुळे कोंड्यापासून दूर होईल.

केसांची ग्रोथ वाढवण्यास मदत करते

मेयोनीजमध्ये अमिनो अॅसीड असतात. जे तुमच्या केसांना ग्रोथ करण्यास मदत करतात. याशिवाय यात भरपूर प्रोटीन असतात.जे केसांच्या मुळांना मजबुती देतात.

केसांना साॅफ्टपणा येतो

मेयोनिजमध्ये फॅटी अॅसिड आणि अमिनो अॅसिड असते जे केसांना हाइड्रेट करण्यास मदत करतात. हे कंडीशनर सारखे काम करते.

केसांना ठेवतो हाइड्रेट

मेयोनिजमध्ये अंडे, तेल, सिरका असल्यामुळे केसांना हायड्रेट करण्यास मदत करतो. हे स्काल्प ला पोषण देण्यापासून केसांना निरोगी ठेवण्यास मदत करतो.

loading image
go to top