
Hair Care : केसांचा कलर जास्त काळ राहत नाही?; तूम्हीही करताय का या चुका!
आजकाल बरेच लोक केसांना स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देण्यासाठी हेअर कलरचा वापर करतात. त्यातही हायलाइट आणि हेअर शेड्स सध्या ट्रेंडमध्ये आहे. ट्रेंडमध्ये राहण्यासाठी सर्वचजण पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करून हेअर कलर करतात.
महिला आणि पुरुष दोघांसाठीही वेगवेगळे हेअर कलर ट्रेंड बाजारात उपलब्ध आहेत. काही लोक फॅशन म्हणून तर काही केस पांढरे आहेत म्हणून केस रंगवतात. केसांना दिलेला रंग अधिक वेळ रहावा असे प्रत्येकालाच वाटते. पण, काही गोष्टी माहिती नसल्याने आपण त्या वारंवार करतो आणि केसांचा रंग लगेचच उतरतो.
हेही वाचा: Hair Fall in Men: 'या' चुका केल्याने गळतात पुरुषांचे केस
केस रंगवल्यावर काय काळजी घ्यावी, कोणते प्रोडक्ट वापरावेत, त्याची काय काळजी घ्यावी हे पाहुयात.
चुकीचे प्रोडक्ट वापरणे
जेव्हा तूही केसाना कलर कराल तेव्हा तुमच्या केसांना कोणता शाम्पू सुट होईल ते तज्ञांना विचारा. अनेकदा नॉर्मल शाम्पू लावल्याने केसांचा रंग लवकर फिका पडतो. कारण त्यात अशा काही गोष्टी असतात ज्या केसांचा कलर जास्त काळ टिकू देत नाही. हे टाळण्यासाठी तुम्ही काही कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू वापरू शकता.
हेही वाचा: Hair Care : हर्बल गोष्टींनी केसं धुण्याचे फायदे!

गरम पाणी
गरम पाण्यामुळे केस कमकुवत होतात, तसेच केसांचा रंगही झपाट्याने उतरतो. हिवाळ्यात डोके धुण्यासाठी फक्त कोमट पाण्याचा वापर करावा.
हेही वाचा: Hair Care: तुमच्या केसगळतीचं कारण अखेर सापडलं! हे तेल लावत असाल तर थांबा नाहीतर...

हिटपासून केस दूर ठेवा
केस सुकविण्यासाठी ते स्ट्रेट कर्ली करण्यासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. ते मशीन आधी गरम होते आणि मग त्याने केसांवर स्टाईल केली जाते. अशामुळे केसांचा रंग लवकर उतरतो.
हेही वाचा: Hair Fall in Men: 'या' चुका केल्याने गळतात पुरुषांचे केस