Hair Care: तुमच्या केसगळतीचं कारण अखेर सापडलं! हे तेल लावत असाल तर थांबा नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Care

Hair Care: तुमच्या केसगळतीचं कारण अखेर सापडलं! हे तेल लावत असाल तर थांबा नाहीतर...

Mineral Oils Disadvantage: महिलांना हल्ली केसगळतीच्या समस्या फार उद्भवताय. डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतर आणि अनेक घरघुती उपाय केल्यानंतरही तुमची केसगळती थांबत नसेल तर त्यामागे हे कारण असू शकतं. हे कारण नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया.

२०-२५ वर्षांच्या तरुण तरूणींमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. अनेकदा केसगळतीच्या समस्यांना महिलांचा कॉन्फिडंस लो होतो. चला तर या समस्येपासून तुम्हाला कशी मुक्ती मिळवता येईल ते जाणून घेऊया.

केसगळतीचे कारण काय?

अनेक वेळा केस गळण्यामागे आपलीच चूक असते, मात्र ती वेळ निघून गेल्यावर आपल्या लक्षात येते. केस तुटण्यासाठी आपला चुकीचा आहारच कारणीभूत असतो असे नाही तर आपण डोक्याला कोणते हेयर ऑईल लावतो याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक तेल केसांसाठी चांगले असतेच असे नाही आणि केसांचे तेल वारंवार बदलून लावल्यानेही खूप नुकसान होते.

हेही वाचा: Hair Fall : केस गळतीवर प्रभावी ठरत आहेत या आधुनिक उपचार पद्धती

हे तेल केसांसाठी आहे घातक ?

बाजारात खनिज तेलाची किंमत खूपच कमी आहे, त्यामुळे बरेच लोक त्याचा वापर करतात, परंतु हे स्वस्त तेल भविष्यात केसांसाठी खूप महागात पडू शकतं. यामुळे टाळूचे खूप नुकसान होते. एकदा केसांची मुळे कमकुवत झाली की केस तुटणे सुरू होते आणि ते थांबवणे कठीण होते. वास्तविक खनिज तेलामध्ये रसायने असतात जी टाळूमध्ये शोषली जातात आणि विष तयार करू शकतात.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

केसांसाठी कोणते तेल चांगले आहे?

जर तुम्हाला तुमचे केस एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीसारखे सुंदर बनवायचे असतील तर केमिकलवर आधारित हेअर ऑइल सोडून नैसर्गिक तेलाचा वापर करा. यासाठी बदाम तेल, ऑलिव्ह तेल, एरंडेल तेल, मोहरीचे तेल आणि खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते.