Home Remedies For Dandruff : हिवाळ्यात केसात वारंवार कोंडा होतोय? घरीच बनवा 'एलोवेरा हेअर पॅक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Remedies For Dandruff

Home Remedies For Dandruff : हिवाळ्यात केसात वारंवार कोंडा होतोय? घरीच बनवा 'एलोवेरा हेअर पॅक'

हिवाळ्यात केसांची काळजी घेणे हे खूप आव्हानात्मक असतं. कारण हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होण्याची अधिक शक्यता असते. अनेकदा केसांची काळजी घेऊनही कोंडा होतो. मग अशात केसातला कोंडा कसा स्वच्छ करायचा, हा खूप मोठा प्रश्न असतो. पण आज आम्ही तुम्हाला यावर रामबाण उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

'एलोवेरा हेअर पॅक केसांसाठी कसा उपयुक्त?

कोरफड हे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. कोरफडचा हेअर पॅक जर तुम्ही केसांवर ट्राय केला तर त्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे, तांबे, लोह, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, क्रोमियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखी काही खनिजे देखील आढळतात जे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

हेही वाचा: Hair Care: नखे एकमेकांना घासल्याने खरंच केसांची वाढ होते काय? वाचा बाबा रामदेव यांनी केलेला दावा...

'एलोवेरा हेअर पॅक' कसा बनवायचा?

  • सुरवातीला कोरफडीचा मोठा देठ घेऊन त्याचे जेल काढा.

  • आता हे जेलमध्ये लिंबू आणि ग्लिसरीनचे काही थेंब घाला.

  • आता हे मिश्रण घेऊन टाळूवर मसाज करा.

  • 10 मिनिटे मसाज केल्यानंतर, 10 मिनिटे राहू द्या.

  • त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.

  • केस धुण्यासाठी फक्त सॉफ्ट शैम्पू आणि कंडिशनर वापरण्याचा प्रयत्न करा.

  • महिन्याभरात तुम्हाला फरक दिसून येईल

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :Hair CareWinterRemedies