
Hair Care : केस वाढण्यासाठी ते सतत कापले पाहिजेत? डॉक्टरांनीच दूर केला हा भ्रम!
Truth About Hair Growth: भारतात एकीकडे तरुण पिढी आधुनिक ट्रिटमेंटकडे वाटचाल करताना दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक घरात आजही आजीबाईंच्या अनुभवातले उपाय करून पाहणारेही आहेत. पिढ्यांपिढ्या चालत आलेला केसांशी संबंधित एक भ्रम एका डॉक्टरांनी तोडला आहे.
एखाद्या मुलीच्या केसांची वाढ होत नसेल तर तिला ते सतत कापण्याचा सल्ला दिला जातो. सतत केस कापल्याने ते वाढतात. त्यांची योग्य वाढ होते, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. हेच खरे मानून अनेकजणी केस नेहमी कापत असतात. पण, हा समज चुकीचा असल्याचा खुलासा एका डॉक्टरांनी केला आहे.
डॉ. जयश्री शरद असे त्यांचे नाव असून त्यांनी यासंबंधीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. जयश्री म्हणाल्या की, केस कापत राहिलो तर ते जास्त वाढतात हा एक मोठा समज आहे. त्यांनी स्पष्ट केले की आपल्या टाळूच्या वर जे काही केस आहेत ती निर्जीव गोष्ट आहे. तुम्ही ते कापले किंवा नाही कापले तरी या गोष्टीचा तुमच्या केसांच्या वाढीवर काहीही परिणाम होत नाही.
त्यामूळे केस वाढतील या आशेने सतत केस कापत राहणे बंद करा. असे केल्याने केस अजून छोटेच होत राहतील. ते वाढणार नाहीत. मग केसांच्या वाढीसाठी काय करायचे याबद्दल डॉक्टर सांगतात की,
केसांची वाढ हि केवळ तेल आणि मसाज याने होते. हा समजही चुकीचा आहे. त्यासाठी प्रथिने, अमीनो ऍसिडस्, जीवनसत्त्वे यांचा आहारात समावेश करा. लोह आणि खनिजे असलेला निरोगी आहार घ्या. तणतणावापासून दूर रहा. कारण तणावाचा थेट परिणाम केसांच्या वाढीवर होतो. जर तुमचे हार्मोनल्स इनबॅलन्स होत असेल तर त्याचाही परीणाम केसांच्या वाढीवर होतो
केसांना फाटे फुटलेत...
केसांना फाटे फुटण्याचा त्रास आजकाल अनेकींना होत आहे. त्यामूळे असे केस ट्रिमिंग करावेत. पण, ते पूर्णपणे कापू नयेत. असा सल्लाही ड़ॉक्टर जयश्री यांनी दिला आहे.