
Hair Care Oilling : तेल ओल्या केसांत लावावं की, कोरड्या? जाणून घ्या योग्य पद्धत
Hair Care Oilling : केस हे आपलं सौंदर्य वाढवतं यात दूमत तर नक्कीच नाही. पण त्या सौंदरयात भर घालण्यासाठी केसांची निगा राखणं आवश्यक आहे. त्यावरच तुमच्या केसांचं आरोग्य आणि सौंदर्य अवलंबून असतं. केसांची निगा राखण्यातला एक मोठा मुद्दा केसांना तेल लावण्यात आहे.
केसांची काळजी घेताना तेल लावणं आवश्यक आहे, पण ते नेमकं कधी लावावं, ओल्या केसांत लावावं की, कोरड्या या समस्या असतात, जाणून घेऊया.

Hair Care Oilling
तेल ओल्या केसांना लावावे की कोरड्या?
केस कधी किंवा ओल्या, कोरड्या केसांना लावतात हा प्रश्न महत्वाचा नाही. तर केसांना तेल लावण्याऐवजी स्काल्पला लावणं आवश्यक आहे. आणि त्यावेळी स्काल्प स्वच्छ असणं गरजेचं आहे. तेल केसांच्या आत मुरावे. यासाठी रात्री तेल लावणे चांगले. तसेच केस धुण्याच्या १ ते २ तास आधीसुद्धा तुम्ही तेल लावू शकता.
ओल्या केसांना हलके तेल लावा
ओल्या केसांना तेल लावायचे असेल तर बदामाच्या तेलासारखे हलके तेल निवडावे. त्यामुळे ते स्काल्पमध्ये जाते. परंतु तेलाचा थर तयार करत नाही.

Hair Care Oilling
कोरड्या केसांना हेवी तेल लावा
जर तुमचे केस कोरडे असतील तर तुम्ही खोबरेल तेलासारखे हेवी तेल वापरावे. हे कोरड्या केसांवर लावणे चांगले आहे, कारण मोठे रेणू ओल्या केसांच्या शाफ्टमध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि केस देखील कोरडे करू शकतात.