Hair Care Tips : केसांची वाढ होत नाहीये? मग 'हे' हेअर मास्क ट्राय करून बघा, लवकरच दिसेल फरक

तुळशीच्या बियांपासून बनवलेले मास्क फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म केसांची मुळे मजबूत ठेवतात. चला जाणून घेऊया या हेअर मास्कबद्दल.
hair care
hair caresakal
Updated on

केसांची काळजी घेण्यासाठी हेअर प्रोडक्ट्सपेक्षा चांगला आहार घेणे जास्त गरजेचे आहे. कारण संतुलित आहारातून केसांना पोषक तत्व मिळतात. केसांना चमक आणण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी न घेतल्यास केसांची मुळे हळूहळू कमकुवत होऊ लागतात. याशिवाय केस गळण्याचे प्रमाणही वाढते.

अशा परिस्थितीत घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये फक्त नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात. तुळशीच्या बियांपासून बनवलेले मास्क फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म केसांची मुळे मजबूत ठेवतात. चला जाणून घेऊया या हेअर मास्कबद्दल.

hair care
Monsoon Hair Care : पावसात भिजल्यावर केसांचा येतो घाणेरडा कुबट वास? असा करा चुटकीसरशी दूर

तुळशीच्या बिया आणि तांदूळ

लागणारे साहित्य

  • 1/4 शिजवलेला भात

  • 1 टीस्पून तुळशीच्या बिया

  • 3 चमचे- कॅरियर ऑईल

  • 1 चमचा- एलोवेरा जेल

  • 1 चमचा दही

  • 2-3 थेंब - इसेंशियल ऑइल

बनवण्याची पद्धत

  • सर्व प्रथम, तांदूळ चांगले शिजवा.

  • तांदूळ शिजल्यावर थोडा वेळ थंड होऊ द्या.

  • नंतर मिक्सरमध्ये 1 चमचा तुळशीच्या बिया, 1/4 कप शिजवलेला भात, 1 चमचा ऐलोवेरा जेल आणि 3 चमचे तेल टाका.

  • या सर्व गोष्टी नीट मिसळा.

  • नंतर वरून इसेंशियल ऑइलचे 2-3 थेंब घाला.

  • तांदूळ आणि तुळशीपासून बनवलेला तुमचा हेअर मास्क तयार आहे.

  • तुम्ही दही देखील वापरू शकता.

असा करा वापर

  • सर्व प्रथम मास्क एका भांड्यात काढा.

  • आता ब्रशच्या मदतीने हेअर मास्क लावा.

  • याच्या वापराने मुळे मजबूत होतात.

  • तांदळापासून बनवलेला मास्क वापरल्याने तुमचे केस चमकदार, दाट आणि लांब होतील.

तुळशीच्या बिया आणि मध

लागणारे साहित्य

  • 1 टीस्पून तुळशीच्या बियांची पावडर

  • 1 टीस्पून लिंबाचा रस

  • 2 चमचे मध

बनवण्याची पद्धत

  • हा हेअर मास्क बनवण्यासाठी तुळशीच्या बियांची पावडर एका भांड्यात घ्या.

  • त्यात 2 चमचे मध आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला.

  • पेस्ट तयार करा आणि केसांना लावा आणि 20 मिनिटांनी धुवा.

Shabda kode:

Related Stories

No stories found.