Hair Care Tips : केसांच्या वाढीसाठी तेल लावून उपयोग नाही; हे सुपर फुड खा आणि कमाल बघा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hair Care

Hair Care Tips : केसांच्या वाढीसाठी तेल लावून उपयोग नाही; हे सुपर फुड खा आणि कमाल बघा!

हिवाळ्यात व्हायरल आजार पसरतात तसे केस आणि त्वचेच्या समस्याही उद्भवतात. हिवाळयात केसांची समस्या अनेकदा जास्त त्रासदायक ठरते. थंड वाऱ्यामुळे केसांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.

केसात कोंडा झाल्याने केस गळणे सुरू होते. ज्यामुळे आपले केस पातळ, कमकुवत आणि निर्जीव दिसू शकतात. केसांना निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पोषक आहार घेणे आवश्यक आहे. कारण आपला सकस आहार केसांना आतून मजबूत बनवण्यास मदत करतो.

हेही वाचा: Hair Wash : हे पाणी आहे केसांसाठी उत्तम; सकाळी केस धुताना नक्की वापरा

तुम्हालाही हा त्रास होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी असेच काही आरोग्यदायी पदार्थ घेऊन आलो आहोत. ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करून केस निरोगी ठेवू शकता.

हेही वाचा: Hair Fall : वयाच्या तिशीनंतर का गळतात केस ? जाणून घ्या कारण व उपाय

पालक

पालकामध्ये आवश्यक खनिजे असतात, जे शरीरासाठी तसेच केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जातात. तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश भाज्या, सूप आणि सॅलडच्या स्वरूपात करू शकता.

हेही वाचा: Hair Care : शक्तीवर्धक वाटणाऱ्या याच पदार्थांमुळे पडतं पुरुषांना टक्कल, वेळीच सावध व्हा नाहीतर...

अंडी

हिवाळ्यात अंड्याचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. अंड्यांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीराव्यतिरिक्त केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जाते. तुम्ही केसांवर अंड्याचा पॅक देखील वापरू शकता.

हेही वाचा: Hair Care Tips : पांढऱ्या केसांसाठी मेथी खरचं गुणकारी आहे का?

संत्री

संत्री हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला जातो. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासोबतच व्हिटॅमिन सी तुमच्या केसांना मजबूत करण्यासही मदत करू शकते. तुम्ही संत्र्याचे फळ, रस सेवन करू शकता.

हेही वाचा: Winter Skin Care : हिवाळ्यातही आलियासारखी स्कीन हवीये? हे करा

गाजर

हिवाळ्यात मिळणारे ताजे गाजर केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्य आणि सौंदर्यासाठीही अप्रतिम आहेत. गाजरात असलेले व्हिटॅमिन ए केसांसाठी चांगले मानले जाते.

हेही वाचा: Hair Care Tips: हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी, कोंड्याच्या टेन्शनला करा बाय बाय

एवोकॅडो


एवोकॅडो हे असे फळ आहे जे नाश्त्यात सर्वाधिक खाल्ले जाते. एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे शरीरातील पीएच पातळी संतुलित करण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.