esakal | हेअर कंडीशनरचा जास्त वापर केल्याने 'हे' होऊ शकतात तोटे

बोलून बातमी शोधा

हेअर कंडीशनरचा जास्त वापर केल्याने 'हे' होऊ शकतात तोटे
हेअर कंडीशनरचा जास्त वापर केल्याने 'हे' होऊ शकतात तोटे
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अनेक जण शाम्पू व हेअर कंडीशनर वापर असतात. केस जेव्हा कोरडे होतात तेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की थोड जास्त हेअर कंडीशनर वापरल्यास परिणाम चांगला होईल. पण हे चुकीच आहे. अति कंडीशनिंग तुमच्या केसांवर बॅकफायर करु शकते. तसेच चिकट, कमजोर आणि निर्जीव होऊ शकतात. मात्र चिंत करु नका. केसांवर लावले जाणाऱ्या हेअर कंडीशनरचे प्रमाण मर्यादित ठेवणे चांगले राहिल. या व्यतिरिक्त हेअर स्टायलिंग उत्पादनांचा उपयोग कमी केल्यानेही चांगला परिणाम दिसू शकतो. यामुळे आम्ही केसांवर अतिरिक्त कंडीशनिंगची लक्षणे काय असतात या विषयी सांगणार आहोत... तर चला जाणून घेऊ

१. हेअर कंडीशनरचा उपयोग काय आहे?

- हेअर कंडीशनरचा उपयोग मुख्यतः माॅश्चरायजिंग, स्मूथिंग आणि केसांच्या गुत्यापासून सुटकार मिळवा यासाठी असतो. ते पोषण प्रदान करते. केसांमध्ये सुधारणा करते. हेअर कंडीशनरचा नियमित उपयोग केल्याने केस मजबूत होतात. कंडीशनरमुळे केसांना शायनी आणि टेक्स्चरपण मिळतो.

२.कंडीशनर कसे काम करता?

कंडीशरचा उपयोग मुख्यतः केसांचे संरक्षण आणि ओलावा राहावा यासाठी केला जातो. ते केसांच्या शाफ्टवर एक सुरक्षात्मक कवच बनवते. त्याने तुमच्या केसांना पोषण प्रदान करुन हायड्रेट करण्यात मदत करते. साधारणतः कंडीशनर पोषक तत्त्वांना केसांमध्ये लाॅक करते. ते प्रदूषकेही केसांच्या बाहेर काढून टाकते. तसेच केसाचे रेशो मजबूत करण्यातही मदत करतात. या प्रकारे हे केस तुटण्यापासून वाचवतात.

३.अतिरिक्त कंडीशनिंग काय आहे?

जेव्हा तुम्ही तुमचे केस खूप काही कंडीशनिंग करता, तेव्हा केसांच्या प्रत्येक रेशो किंवा क्युटिकलमध्ये भारी कोटिंग होते. हे तुमच्या केसांना आवश्यक प्रमाणात अधिक ओलावा देते. या कारणामुळे इतर हेअर केअर उत्पादने जसे की, हेअर ऑईल आणि सीरम केसांच्या रेशोत प्रवेश करु शकत नाहीत. यामुळे ते लावण्याचा काही फायदा होत नाही. कारण ते योग्य पद्धतीने काम करत नाही. या व्यतिरिक्त केस इतके गुळगुळीत होतात की स्वतःचे व्हाॅल्युम गमावून बसतात.

४.केसांना अतिरक्त कंडीशनिंगची लक्षणे

- केस पातळ होणे : जेव्हा तुम्ही केसांना खूप कंडीशनर लावता, तेव्हा ती गळायला सुरु होतात. कारण जास्त कंडीशनिंगमुळे केसांमध्ये खूप जास्त ओलावा राहतो.

- केसांना व्यवस्थित करण्यास वेळ लागतो: जर तुमचे केस कुरुळे असतील आणि त्यांना तुम्ही जास्तच कंडीशनर लावले असेल तर ते बाऊन्स गमावले. तसेच व्यवस्थित सेट होणार नाहीत. तुम्ही अतिरिक्त कंडीशनिंग केल्याने हेअर स्टायलला मॅनेज करु शकणार नाही.

- केस खूपच नाजूक होतात : तुमचे केस सुंदर, चमकदार होतील. मात्र त्यात चिकटपणा आणि सेट करण्यात अडचणी येतील.