गुळ ,मेथीच्या वापराने पांढऱ्या केसांचा Problem मुळापासून होईल दूर

पांढऱ्या केसांपासून सुटका मिळावण्यासाठी पर्याय
Hair Care
Hair CareEsakal

आजकाल लहानमुलांपासून ते मोठ्या पर्यत केस पांढरे होऊ लागले आहेत. लहान वयात केस पांढरे होणे ही सामान्य बाब झाली आहे. ही समस्या टाळण्यासाठी महागडी उत्पादने सर्रास खरेदी केली जातात. याचा फायदा होतोच असे नाही. याशिवाय पार्लरचा मार्ग स्विकारला जातो. कलरिंग, टचअप करून पांढरे केस लपवण्याचा प्रयत्न केला जातो. हा मार्गहि पर्यायी ठरतो. अशावेळी स्वयंपाक घरातील काही पदार्थ जे नियमित वापरता याच्या मदतीने यावर उपाय करता येतो. यासाठी फार काही नाही तर गुळ आणि मेथीचा वापर करून या समस्येला दूर करता येते. चला तर जाणून घेऊया.

पांढऱ्या केसांपासून सुटका मिळावण्यासाठी पर्याय

आपल्या स्वयंपाक घरात नियमित वापरला जाणारा गुळ आणि मेथी तुम्ही नियमित खाऊ शकता. सकाळी- सकाळी उठल्याबरोबर गूळ आणि मेथी एकत्र खाल्ल्याने केस पांढरे होण्याची समस्या दूर होऊ शकते. आयुर्वेदानुसार पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा एक खात्रीशीर उपचार मानला जातो. हिवाळ्यात केस गळण्याची समस्या खूप वाढते. जर तुमचे केस वेळेआधी पांढरे आणि कमकुवत होत असतील तर या पद्धतीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

असा लावा लेप

मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा

सकाळी त्याची पेस्ट तयार करून घ्या

यात खोबरेल तेल मिसळा

आता ही पेस्ट केसांना लावा.

यामुळे तुमचे केस हळूहळू पांढरे होणे बंद होतील.

पावडरीचा करा वापर:

मेथीच्या दाण्याची बारीक पावडर तयार करून घ्या.

ही पावडर खोबरेल तेलात मिसळा आणि केसांच्या मुळांना हळूवारपणे लावा.

यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल.

केस गळणेही बऱ्याच अंशी कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com