Hair Care Tips : कोंडा दूर करण्यासाठी बेस्ट आहे हा घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक...

कोंडा कमी होण्यासाठी आपण केसांना तेल लावतो, बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरतो किंवा हेअर मास्क नाहीतर हेअर केअर ट्रीटमेंटस असे काही ना काही उपाय करतो.
Hair Care Tips
Hair Care Tipssakal
Updated on

कोंडा ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे अनेकजण हैराण असल्याचे आपण पाहतो. केसांची मुळे कोरडी पडल्याने किंवा प्रमाणापेक्षा जास्त तेलकट झाल्यानेही केसांत कोंडा होतो. याशिवायही कोंडा होण्यामागे प्रदूषण,आपण केसांसाठी वापरत असलेली उत्पादने अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. पण हा कोंडा एकदा झाला की तो काही केल्या कमी होत नाही.

कोंडा कमी होण्यासाठी आपण केसांना तेल लावतो, बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरतो किंवा हेअर मास्क नाहीतर हेअर केअर ट्रीटमेंटस असे काही ना काही उपाय करतो. पण त्यामध्ये बरेच पैसे खर्च करावे लागतात. तसेच त्याचा म्हणावा तितका उपयोग होतोच असे नाही. म्हणूनच कोंडा जाण्यासाठी आज आपण घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय पाहणार आहोत.

Hair Care Tips
Monsoon Hair Care : पावसात भिजल्यावर केसांचा येतो घाणेरडा कुबट वास? असा करा चुटकीसरशी दूर

1. केस धुण्याआधी हे काम नक्की करा

लिंबू कोंड्याच्या समस्येसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. एका वाटीत खोबरेल तेल घ्या, ते कोमट करा. त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने केसांच्या मूळांशी व्यवस्थित मसाज करा. केस रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुवून टाका. आदल्या दिवशी तुम्हाला हे करायचे लक्षात राहीले नाही तर दुसऱ्यादिवशी सकाळी आंघोळीच्या 2 तास आधीही तेल आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण लावल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही आठवड्यातून एकदा हा प्रयोग करु शकता.

2. कोरफडीचा गर

कोरफडीचा गर हा कोंडा कमी होण्यासाठी आणखी एक उत्तम उपाय आहे. 1 वाटी कोरफडीच्या गरात 2 चमचे कॅस्टर ऑईल एकत्र करुन हे मिश्रण रात्री झोपताना केसांच्या मूळांशी लावा. रात्रभर केस तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाका. कोरफडीचा गर थोडा चिकट असल्याने तो निघण्यास वेळ लागतो. त्यामुळे केस दोन ते तीन वेळा पाण्याने आणि शाम्पूने स्वच्छ धुवा.    

3.  कडूलिंबाच्या पानांचा उपयोग 

कडूलिंबाच्या पानांमध्ये अतिशय चांगले आयुर्वेदिक गुणधर्म असतात. कडूलिंबाची भरपूर पाने पाण्यात घालून ते पाणी चांगले उकळा. कडूलिंबाच्या पानांचा हेअरमास्कही करु शकता. दोन चमचे कडूलिंबाच्या पानांची पावडर किंवा पेस्ट घेऊन त्यामध्ये दही एकत्र करा. केसांच्या मूळांशी आणि केसांना हे मिश्रण लावा. अर्धा तास हा मास्क ठेवून नंतर धुवून टाका. 

Chitra kode:

Related Stories

No stories found.