esakal | हेअर डायमुळे कमी वयात केस पांढरे होण्याचा धोका? |Hair Care Tips
sakal

बोलून बातमी शोधा

हेअर डायमुळे कमी वयात केस पांढरे होण्याचा धोका?

हेअर डायमुळे कमी वयात केस पांढरे होण्याचा धोका?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शरीरमध्ये न्युट्रिशियनची कमी, खूप ताण-तणाव, हार्मोनल बदल या कारणांमुळे कमी वयात केस पांढरे होऊ शकतात. पण ते लपविण्यासाठी लोक तात्पुरता पर्याय म्हणून हेअर कलर करण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे जे केस काळे आहेत त्यांचेही नुकसान होऊ शकते आणि हळू हळू काळे केस देखील पांढरे होऊ शकतात. संशोधनमध्ये असे समोर आले की, जर आहारात पुरेसे व्हिटॅमिनचे सेवन केले तर केस पुन्हा काळे होऊ शकतात.

मेडिकल न्युज टुडेने दिलेल्या माहितीनुसार, जर केमिकल युक्त प्रॉडक्ट शॅम्पू, कंडिशनर, हेअर कलर इ. काळ्या केसांवर प्रयोग करत राहिला तर त्यामुळे (Premature hair graying) कमी वयात केस पांढरे होण्याची सुरवात होऊ शकते. हेअर डायमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईट हे हानिकारक केमिकल असते. त्याशिवाय धुम्रपान केल्यामुळे देखील केस पांढरे होण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे केसांची काळजी घ्यायची असेल तर हेअर कलर करू नका.

हेही वाचा: कोरोनाकाळात डेटवर जाताना काय काळजी घ्यावी?

१.लीड एसिटेट(Lead acetate)

काही हेअर डायमध्ये एसिटेट असते केसांना गडद रंग देण्यासाठी उपयोगी ठरतो, पण त्यामुळे केसांमधील मेलॅनिनचे नुकसान होते आणि कमी वयात केस पांढरे होतात.

२. पीपीडी (PPD)

काही हेअर डायमधअये पीपीडी म्हणजे पी-फिनायलेनेडाईमाईन (p-phenylenediamine) वापरले जाते ज्यामुळे केसांचा रंग जास्त काळ टिकून राहतो. ७५ टक्के हेअर डायमध्ये केमीकल उपलब्ध असते. हे केमिकल केसांशिवाय फुफ्फुस, किडनी, लिव्हर, आणि नर्व्हस सिस्टिमवर वाईट परिणाम करू शकते.

३.अमोनिया( Ammonia)

हेअर डायमध्ये अमोनियाचे देखील खूप वापर होते ज्यामुळे त्वचासंबधी समस्या, श्वास घेण्यास अडथळा, डोळ्यांना इन्फेकशन सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा: Narcissism म्हणजे काय? करिअरचा ग्राफ वाढवण्यात असू शकतो महत्वाचा वाटा

डाय करण्याऐवजी करा हे काम

१.अॅन्टीऑक्सिडेंट फूड

जर आहारामध्ये जास्त अॅन्टीऑक्सिडेंटपेक्षा घेतल्यास ऑक्सीडेटिव तान कमी होतो आणि केस पुन्हा काळे होऊ शकतात. त्यामुळे रोज ताजी फळ आणि भाज्या, ग्रीन टी, जैतूनचे तेल, मासे यांचा समावेश आहाराज करावा.

२. व्हिटॅमिनयुक्त आहार

आहारमध्ये व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. सी-फूड, अंडी, आणि मांस व्हिटॅमिन बी-१२ चा मिळते तर दुध, पनीरमधून व्हिटॅमिन डी मिळते.

loading image
go to top