Narcissism म्हणजे काय? करिअरचा ग्राफ वाढवण्यात असू शकतो महत्वाचा वाटा; संशोधनातील निष्कर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narcissism म्हणजे काय? करिअरचा ग्राफ वाढवण्यात असू शकतो महत्वाचा वाटा

Narcissism म्हणजे काय? करिअरचा ग्राफ वाढवण्यात असू शकतो महत्वाचा वाटा

कोणत्याही क्षेत्रामध्ये यशाची पायरी चढण्यासाठी सर्वांना कठीण परिश्रम करावे लागतात. एका संशोधनानुसार अंहकारी स्वभाव असणे अनेकांना करिअरमध्ये फायदेशीर ठरतो. संशोधनानुसार, असा दावा केला आहे की खूप अंहकारी स्वभाव असलेले लोक कंपनीचे सीईओ बनण्यासाठी २९ टक्क्यांनी अधिक पात्र ठरले.

संशोधनकर्त्यांनी इटलीमधील, २४१ सीईओंचा आत्मविश्वास आणि आत्मकेंद्रिततेच्या पातळीची तुलना केली. सर्वांच्या वर्क हिस्ट्रीसोबत प्रश्नावलीद्वारे ठराविक माहितीद्वारे ही तुलना करण्यात आली.

संशोधनकर्त्यांच्या निष्कर्षानुसारर नार्सिसिज्म (अहंकार) ची उच्च पातळी गाठणारे अधिकारी कंपनीमध्ये खूप लवकर प्रमोशन मिळवितात. यावरुन समजते की, Toxic Personality Disorder असेलेले लोक कंपनीचे प्रमुख होण्याचे लक्ष्य लवकर पूर्ण करतात आणि त्याचा लाभ होतो. पण असे का घडण्यामागील कारण तज्ज्ञांना माहित नाही.

नार्सिसिज्म काय आहे?

नार्सिसिज्म अशी अवस्था आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आत्मकेंद्रीत ( Self Obsessed)असतो. आपल्या गुणांवर या लोकांन प्रमाणापेक्षा जास्त गर्व किंवा अहंकार असतो. मानस शास्त्रानुसार, नार्सिसिज्म ला सहसा गर्विष्ठ किंवा अहंकारी समजले जाते. अशा स्वभावाच्या व्यक्तींमध्ये दुसऱ्यांसाठी सहानभूतीची कमी असते. मानसशास्त्रात याला एक प्रकार Personality Disorder मानले जाते.

अंहकार कंपनीच्या प्रमुखांची विशिष्ट विशेषता :

संशोधनकर्त्यांच्या माहितीनुसार,अंहकार ही सीईओ बनण्यासाठी विशेष योग्यता आहे असे व्यापकपणे स्वीकारले आहे. पण, या प्रमुखांच्या नियुक्तीमध्ये नार्सिसिज्मची भूमिका अद्याप अभ्यासलेली नाही. इटलीमधील फ्री युनिर्सिटी ऑफ बोजेन बोलजानोमार्फत केलेले हे संशोधन मिलानच्या पॉलिटेक्निक यूनिवर्सिटीच्या पीएचडीच्या विदयार्थी आणि सहायक प्रोफेसरद्वारे पाओला रोवेली यांनी आयोजित केले आहे.

संशोधन द लीडरशीप क्वार्टरली जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिध्द झाले होते. संशोधकांचे म्हणणे आहे की, आमच्या समोर आलेले निष्कर्ष काही प्रमाणात चिंताजनक आहे.

दावा नाही पण शक्यता वर्तवली आहे

संशोधकांनी असा दावा केला नाही की अंहकारी आणि आत्मकेंद्रीत स्वभाव व्यक्तीच्या करिअरमध्ये लवकर प्रगतीचे कारण ठरू शकते पण ही फक्त शक्यता वर्तविली जात आहे. नार्सिसिस्ट व्यक्ती प्रमोशनसाठी स्वत:ची क्षमता वाढविण्यामध्ये कुशल असू शकतात. ही त्यांची रणनिती असू शकते जी खूप प्रभावी ठरू शकते.

एनपीआई स्कोरनुसार निष्कर्ष काढण्यात आला:

संशोधनासाठी २४१ सीईओंना सामील केले गेले होते. १९७९ मध्ये युएस मधील रॉबर्ट रस्किन और हॉवर्ड टेरी यास्टोरी संशोधकांनी लोकाच्या गुणांच्या पातळीचे मुल्यमापन करण्यासाठी विकसित केलेल्या पध्दीनुसार टीममधील सर्व नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी इन्वेंटरी (एनपीआई) च्या सीईओंच्या उत्तरांचा वापर केला आहे.

एनपीआयने दिलेल्या प्रश्नावलीमध्ये ४० बायनरी चॉईस स्टेटमेंट निवडण्याचा पर्याय लोकांसाठी उपलब्ध होता. ''ज्यामध्ये जगावर राज्य करण्याचा विचाराची मला भिती वाटते'' किंवा जर मी जगात राज्य केले तरी हे योग्य असेल'' असे पर्याय देण्यात आले होते. दुसरा पर्याय नार्सिसिज्म दर्शविणारा आहे. एनपीआय पुरा करणाऱ्या पण नार्सिसिज्मवाले उत्तर किती वेळा दिले त्यानुसार लोकांना ४० पैकी गुण देण्यात आले होते.

एनपीआय स्कोअरची तुलना सीईओच्या सीव्हीनुसार कंपनीत प्रमोशोनसोबत केली गेली. समान योग्यता असणारे आणि मेहनती उमेद्वारांची तुलना नार्सिसिज्ममध्ये उत्तम गुण मिळविणाऱ्यांसोबत केली असता सीईओची होण्याची शक्यता २९ टक्के अधिक होती.