Hair Fall | फॉलो करा या Tips, ७ दिवसात केस गळणे कमी होईल

कामाचा तणाव (Work Stress), अयोग्य आहार (Diet plan), चुकीची जीवनशैली (Lifestyle) तसेच व्यसनाधीनता (Addiction) इत्यादीमुळे केसगळतीची समस्या वाढत आहे.
Hair Loss I Hair Gain Tips
Hair Loss I Hair Gain TipsEsakal

केसगळती (Hair fall) ही आजकालची सामान्य समस्या बनलीय. कामाचा तणाव (Work Stress), अयोग्य आहार (Diet plan), चुकीची जीवनशैली (Lifestyle) तसेच व्यसनाधीनता (Addiction) इत्यादीमुळे केसगळतीची समस्या वाढत आहे. शिवाय केसांच्या काळजीसाठी (Care of Hairs) अशी उत्पादने (Products) वापरली जातात, जी तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान करतात. विशेषतः हिवाळ्यात (Winter) केस गळण्याचे प्रमाण खूप वाढते. अशा परिस्थितीत उत्पादने वारंवार बदलण्याऐवजी आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत.

Hair Loss I Hair Gain Tips
DIY: केस गळती पासून मुक्तता मिळवायची आहे?

1. केस विंचरताना सावधगिरी बाळगा (Be Careful when Combing Hair )-

गुंतलेले केस कधीही थेट विंचारू नका. त्यामुळे तुमच्या केसांना खूप नुकसान होऊ शकते. केस विंचरण्याचा उत्तम मार्ग म्हणजे केस मध्यभागी पकडून तळापासून विलग करणे. यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे तुम्हाला लगेच दिसेल. रोज अशाच प्रकारे केस विंचरावेत.

2. तेलकट केसांवर कंडिशनर वापरू नका (Don’t use conditioner on Oily Hairs)-

जर तुमचे केस (Hair) तेलकट (Oily) असतील तर तुम्ही त्यावर कधीही कंडिशनर (conditioner) वापरू नका. त्यामुळे केस गळण्याची (Hair Loss) शक्यता खूप वाढते. जर तुम्हाला कंडिशनर लावायचे असेल तर आठवड्यातून एकदाच (Once in a week) कंडिशनर वापरा.

Hair Loss I Hair Gain Tips
ओले केस असताना करु नका या चुका, नाहीतर...

3. झोपताना केसांची विशेष काळजी घ्या (Take special care of hair while Sleeping)-

झोपताना तुम्ही वापरत असलेल्या उशीचे कव्हर हे सिल्क मटेरियलचे (Silk Material) असावे हे लक्षात ठेवा. असे केल्याने केसांना गुळगुळीत पृष्ठभाग मिळेल आणि केसांना कोणतेही नुकसान होणार नाही.

4. केसांना आठवड्यातून दोनदा तेल लावा (Apply oil to hair twice a week)-

आपल्यापैकी बहुतेकांना केसांना तेल (Oil) लावायला आवडत नाही. असे केल्याने ते तेलकट किंवा चंपू दिसतील असे त्यांना वाटते, पण असे नाही. तुम्ही रात्री तेल लावून झोपू शकता, सकाळी उठून केस धुवू शकता. केसांना तेल न लावणे हे देखील केस गळण्याचे एक मोठे कारण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com