Hairstyle : आलिया भट्टसारखा लुक हवाय ? आजच ट्राय करा या हेअरस्टाईल

आलिया प्रत्येक लुकवर काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते. त्यात तिचा स्वतचा मिडास टच असतो.
alia bhatt
alia bhattgoogle
Updated on

पुणे : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कपूरने पून्हा एकदा सिद्ध केले की, ती ‘वन ऑफ विनिंग चॉईस’ आहे. याचवर्षी आलिया भट्टवरून कपूर बनली. आणि लवकरच ती आईसुद्धा होणार आहे. आलिया लाखो तरूणींची स्टाईल आयकॉन आहे. आलियाची पोनीटेल हेअरस्टाईल सध्या ट्रेंडमध्ये आहे.

आलिया प्रत्येक लुकवर काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते. त्यात तिचा स्वतचा मिडास टच असतो. केवळ जीन्सवरच नाही तर साडी, लेहंग्यासारख्या पारंपारिक ड्रेसिंग स्टाईलवर देखिल पोनी घातली जाऊ शकते. हेही आलियाने सिद्ध केले आहे.

गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आलियाने साडी नेसली होती. या साडीच्या लुकवर तिने पोनी बांधली होती. त्या पोनीमध्ये तिने रेड रोज देखील घातले होते. आलियाचा ही पोनी अनेक तरूणींनी फॉलो केली होती. लग्न आणि समारंभात तूम्ही अशी हेअर स्टाईल करू शकता.

लग्न सोहळ्यात ब्रायडल मेकअप आणि ड्रेस आणि हेअर स्टाईल इतके हेवी असते की बिचारीला घामाच्या धारा लागलेल्या असतात. अशावेळी आलियाची पोनी नवरीला थोडा मोकळेपणा देऊ शकते, असे, सेलिब्रीटी हेअरस्टायलिस्ट राधिका यादव म्हणतात. पोनी बांधायला सोपी असल्याने वेळेची बचत होते.

केसांच्या मध्यभागी भांग पाडून बांधलेली पोनी आलियावर अधिक आकर्षक वाटते. केवळ मोकळे केस सोडण्यापेक्षा हा बेटर ऑप्शन आहे.

दमट हवामानासाठी ही हेअरस्टाईल परफेक्ट आहे. आलिया भट्टची हाल्फ पोनी स्टाइल अर्ध्या केसांची पोनी बांधल्याने लांब केस असणाऱ्यांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे.

ब्रायडल लुकवर त्याच त्या हेअर बन घातलेल्या हेअर स्टाइल आता कॉमन झाल्या आहेत. केसांचा मधोमध भांग पाडून साईडने सागरवेणी घालून बांधलेली पोनी तूम्हाला अधिकच क्लासी लुक देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com