
कोल्हापूर: नेहमी हसतमुख राहणं आणि आनंदी राहणं हे जीवनात थोडे मुश्किलच असते. परंतु आपल्या जगण्याची पद्धत आपणच बदलून आपली चिंता आणि मनामध्ये असणारे तणाव सहजपणे दूर करू शकतो. आयुष्यामध्ये आपल्याला अनेक चढउतार येत असतात. त्यावेळी आपल्याला अनेक संकटाशी सामना करावा लागतो. यातूनच आपोआपच आपल्या मनामध्ये निराशा येत असते. अशावेळी आपण आनंदी राहणे व चेहरा हसरा ठेवणे आवश्यक असते. प्रत्येक समस्यावर उपाय हा असतोच. त्यामुळे आपल्याकडे असे काही पर्याय उपलब्ध असतात यातून आपण प्रत्येक समस्यांचे निरसन करू शकतो. आणि त्या काळात आपण आनंदी राहू शकतो.
चिंता आणि तणाव हे जीवनातील अविभाज्य घटकच बनले आहेत .परंतु याच्याशी लढण्याची तयारी आपली असणे आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या मनाचा दृष्टिकोण आणि आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. यातूनच आपण चांगले जीवन जगू शकतो. जीवनात आनंदी राहण्यासाठी रूटीनमध्ये थोडे बदल केले आणि दृष्टीकोन बदलला तर नक्कीच जीवन आनंदी जगू शकतो. यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत. ज्यामुळे आपण आनंदी राहू शकतो.
चेहर्यावर हास्य आणून टाळा दुःख
ज्यावेळी आपण आनंदी असतो त्याच वेळी आपल्या चेहऱ्यावर हास्य आणि समाधानाचे वातावरण असते. आपल्या हसण्यामुळे आपल्या मेंदूतील डोपामाइन हे हर्मोन तयार होतात. यामुळे आपण खूश राहतो परंतु असेही करून चालणार नाही की आपण प्रत्येक वेळी चेहऱ्यावर नकली हास्य आणून फिरत राहणे. परंतु सकारात्मक विचार आणि आपण आपल्याच कामाची पद्धत चांगल्या पद्धतीने पार पडली तर आपण नक्कीच चेहऱ्यावरचे हास्य दुसऱ्यांना आपोआप दिसते.आपल्या दररोजच्या सकाळची सुरुवात चेहर्यावर हास्य आणून ते आरशात पाहून करावी.
नियमित व्यायाम आवश्यक
व्यायाम फक्त आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो असे नाही. परंतु नियमित व्यायाम केल्यामुळे आपल्या आनंदा मध्येही वाढ होत असते. आपले शरीर अधिक क्रियाशील राहते. यामुळे आपल्या मनातील तणाव आणि चिंता या भावना कमी होतात आणि त्यातूनच आपल्याला उत्साह निर्माण होतो. यासाठी नियमित व्यायामाची सवय लावून घ्या.
सकारात्मक व्यक्तींच्या बरोबर रहा
तुम्ही खुश राहण्यासाठी तुमच्या आसपासच्या व्यक्ती त्याच पद्धतीची असण्याची आवश्यकता आहे .जे नेहमी सकारात्मक विचार मनामध्ये ठेवतात. या व्यक्ती नेहमीच निराशेच्या भावना व्यक्त करू लागल्या तर आपल्याही मनात निराशा निर्माण होते. त्यामुळे आपण दुसरे काहीच विचार करू शकत नाही. यासाठी सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात नेहमी रहा.
शांत आणि दीर्घ श्वास घ्या
तुम्ही कधीही तणावग्रस्त असाल आणि तुम्ही निराशेच्या वाटेवर जात असाल तर स्वतःला शांत ठेवण्याची गरज आहे अशा वेळी एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि आपले डोळे बंद करून आपल्या जुन्या आनंदी क्षणाला आठवत रहा. तुम्हाला जे चांगले ठिकाण आवडते त्या ठिकाणाला आपल्या मनात आणा. त्या ठिकाणांमध्ये तुम्ही मनातूनच रममाण व्हा. प्रत्येक श्वास सोडताना मनातूनच पाच पर्यंत आकडे मोजत राहण्याचा प्रयत्न करा. यातून आपण नक्कीच आनंदी राहाल आणि सकारात्मक जीवन जगण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.