
Happy Bday Kashmera Shah : बर्थडे गर्ल कश्मिरा नवी स्टाईल आयकॉन; क्लासी लुकसाठी ती दितेय खास फॅशन टीप्स
नवी स्टाईल आयकॉन म्हणून प्रकाशझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री कश्मिरा शाहचा आज वाढदिवस आहे. मल्टीटॅलेंटेड वूमन म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. कारण, ऍक्टींग, कॉमेडी यासह फिटनेस,फॅशन याबाबतीतही कश्मिरा चाहत्यांना टीप्स देत असते. कश्मिराने 'हॅलो बॉलीवूड' या टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात केली होती.
कश्मिरा शाह हिने अनेक भारतीय चित्रपटांमध्ये आणि टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अंजनीबाई लोळेकर यांची ती नात आहे. कश्मिरा शाहचा जन्म २ डिसेंबर १९७१ रोजी झाला. कश्मिराचे शालेय शिक्षण प्रिन्सेस हायस्कूल, मुंबई येथून झाले. जय हिंद कॉलेज, मुंबई येथून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कश्मिराने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या कुटुंबातील विविधतेमुळे ती महाराष्ट्रीयन आणि गुजरातीही आहे.
सध्या ती सोशल मिडीयावर ऍक्टीव्ह असून तिच्या ट्रेंडींग लुकचे फोटोही शेअर करत असते. तूम्हालाही तिच्यासारखे दिसायचे असेल तर तिची हटके स्टाइल कॉपी करा.

कोणत्याही ड्रेसमध्ये कंफरटेबल वाटत नसेल. तर, तो ड्रेस आपल्याला घालावा वाटत नाही. त्यामूळे कंफरटेबल फॅशनसाठी तूम्ही काश्मिरासारखा कूर्ता घालू शकता.

तुम्ही व्हायब्रंट कव्हर साडी घालू शकता. काश्मीरप्रमाणेच केशरी रंगाच्या साडीसोबत गडद लिपस्टिक लावा आणि साडीवर मॅचिंग ब्लाउज घाला.

जर तुम्ही बीचवर विचार करत असाल, तर तुम्ही पांढरा टॉप आणि स्कर्टसह ऍन्टीक स्टाइलचे दागिने घालू शकता.

हिवाळ्यात स्वेटर घातल्याने कोणतीच फॅशन करता येत नाही. अशावेळी ही खास स्टाइल तूम्हाला सूट करेल.
