Happy New Year 2023 : दरवर्षी नव्या वर्षात संकल्प करूनही पूर्ण न होणारे ७ संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 New Year resolutions

Happy New Year 2023 : दरवर्षी नव्या वर्षात संकल्प करूनही पूर्ण न होणारे ७ संकल्प

Happy New Year : प्रत्येक नवीन वर्ष प्रगती, विकास आणि यशाच्या दिशेने एक नवीन आशा म्हणून येते. यासाठी दरवर्षी लाखो लोक नव-नवीन संकल्प करतात.

मात्र, काही लोकांचे संकल्प नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच खंडित होतात. दरवर्षी वर्षाच्या शेवटी असे अनेक संकल्प केले जातात. मात्र, काही ना काही कारणांमुळे ते पूर्ण होण्याऐवजी अपूर्ण सोडले जातात.

असे अनेक संकल्प आहेत जे आजतागायत ठरवूनही साध्य झाले नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही संकल्पांबाबत सांगणार आहोत. जे दरवर्षी लाखो लोक करण्याचं ठरवतात. मात्र, ते पूर्ण होत नाहीत.

नव्या वर्षासाठी ठरवण्यात येणारे सामान्य संकल्प

1. निरोगी अन्नाचे सेवन

कोणताही संकल्प असो वा नसो, दरवर्षी लाखो लोकं वर्षांच्या शेवटच्या दिवशी नव्या वर्षात निरोगी अन्नाचे सेवन करण्याचे निश्चित करतात. मात्र, काही दिवसांनी विविध मसालेदार पदार्थ पाहून हा संकल्प संकल्पच राहतो.

2. नियमित व्यायाम

दरवर्षी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला करोडो लोक निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणार असल्याचा संकल्प करतात. निरोगी आरोग्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.

काही लोक लठ्ठपणा कमी करण्याच्या उद्देशाने तर काहीजण निरोगी राहण्यासाठी व्यायाम करण्याचा संकल्प करतात. परंतु व्यस्त जीवन आणि वेळापत्रकामुळे हा संकल्प अनेकदा पूर्ण केला जात नाही.

3. लक्ष्य निश्चित करेल

नववर्षाला नवनवीन लक्ष्य ठरवून त्यावर वाटचाल करण्याचे व्रत बहुतेक तरुण करतात, परंतु अनेक वेळा मार्ग अनुकूल नसल्यामुळे जीवनाची उद्दिष्टे बदलावी लागतात आणि मग ठरवलेले लक्ष्य अपूर्णच राहते.

4. वजन कमी करण्याचा संकल्प

वाढलेल्या वजनामुळे त्रस्त नागरिक नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला वजन कमी करण्याचा संकल्प करतात. यातील काही जण तो तडीस नेतात, तर काहींचा संकल्प संकल्पचं राहतो

5. वाईट सवयी सोडणे

बहुतेक लोक नवीन वर्षात वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करतात. काही जण हा संकल्प पूर्ण करतात, तर काही जण काही कारणाने संकल्पाला केराची टोपली दाखवत वाईट सवयी सुरूच ठेवतात.

6. खर्च कमी करून बचत करणे

वाढती महागाई लक्षात घेता अनेकजण नव्या वर्षात नको असलेला खर्च कमी करण्याचा आणि जास्तीत जास्त पैशांची बचत करण्याचा संकल्प करतात. मात्र, अनेकद परिस्थिती आणि समस्यांमुळे हा संकल्प पूर्ण होण्यास अडचणी येतात.

7. नाते संबंध अधिक दृढ करणे

सध्याच्या व्यस्त जीवनात अनेकांना कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत, दरवर्षी बरेचजण काही झालं तरी कुटुंब आणि मित्रांसाठी नक्कीच वेळ काढण्याचा संकल्प करतात. मात्र, कामाचा वाढता ताण लक्षात घेता हा संकल्प काही प्रमाणात पूर्ण करण्यास यश मिळते.

टॅग्स :Weight LossHappy New Year