
हरतालिका सण भगवान शिवाला समर्पित असून विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी साजरा होणारा हा सण २६ ऑगस्टला आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. मराठीतून खास शुभेच्छा देऊन सण अधिक खास बनवा.
Hartalika Vrat 2025 Marathi wishes for loved ones : गणेश चतुर्थीच्या एक दिवसआधी हारतालिका साजरी केली जाते. हा सण भगवान शिवाला समर्पित असते. पाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका साजरी केली जाते. असे मानले जाते की व्रताच्या प्रभावमुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. विवाहित महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी हा उपवास करतात आणि शंकराची मनोभावे पूजा करतात. यंदा २६ ऑगस्टरोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या सणाला अधिक खास बनवण्यासाठी मराठीतून खास शुभेच्छा देऊ शकता.