
Smile Benefits: चेहऱ्यावरचं हसू छान दिसतं म्हणून अनेकजण हसतात. मात्र नैसर्गिक हसू किती महत्वाचं असतं याची तुम्हाला कल्पना आहे काय? तुमच्या हसण्याने तुमच्या शरीरात सकारात्मकतेचा संचार होतो. खरं तर हसण्याचा थेट संबंध तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी आहे. अलीकडे केल्या गेलेल्या स्टडीमध्ये हे स्पष्ट झाले आहे. तेव्हा हसण्याचे तुम्हाला किती फायदे होऊ शकतात ते जाणून घ्या.
हसण्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही आधीपेक्षा जास्त आकर्षक दिसता. तुमची स्माईल तुमच्या मेंदूच्या भागाला ट्रिगर करते जी तुमच्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. असं मानलं जातं की जगात ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोक दिवसातून २० पेक्षा जास्त वेळा हसतात. (Health News)
हसण्यामागे दातांची महत्वाची भूमिका
तुमच्या स्माईलमागे तुमच्या दातांची मोठी भूमिका असते. सरळ दातांच्या लोकांना जास्त विश्वासपात्र आणि आत्मविश्वासी मानल्या जातं. डॉक्टरांच्या मते, अनेकांना हसणे म्हणजे फक्त सुंदरता वाढवण्यासाठी हसायचं असतं असं वाटतं. मात्र त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. स्माईल तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. दातांविषयी बोलताना शास्त्रज्ञ म्हणतात, दातांचा आकार बरोबर नसल्यास त्याचा परिणाम तुमच्या हसण्यावरही होतो.
१८ वर्षापर्यंतची मुले दिवसभऱ्यात ४०० वेळा हसतात
शास्त्रज्ञांनी लावलेल्या एका शोधातून असे निदर्शनास आले आहे की, १८ वर्षांपर्यंतची मुले एका दिवसात ४०० वेळा हसतात. तर यातील अर्ध्यापेक्षा जास्त मुले खळखळून हसतात. तसेच शास्त्रज्ञांनी हे देखील सांगितले की वयानुसार लोकांचं हसणं कमी कमी होत जातं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.