esakal | दम्याचा त्रास आहे?; आहारात घ्या 'हे' चार पदार्थ

बोलून बातमी शोधा

Food
दम्याचा त्रास आहे?; आहारात घ्या 'हे' चार पदार्थ
sakal_logo
By
शर्वरी जोशी

आपल्या जीवनशैलीचा आणि आहारपद्धतीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आपल्या आहारात कायम सकस व पौष्टिक पदार्थांचाच समावेश करायला हवा, असं वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येतं. सध्याच्या काळात प्रत्येकाचा कल फास्टफूड, जंक फूड खाण्याकडे आहे. परंतु, या पदार्थांमुळे अनेक जण शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. यामध्येच काहींना दमा, श्वसनासंबंधी आजार असतील तर त्यांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. अनेकदा ऋतू बदलला की दमा किंवा अस्थमा (asthma) असलेल्या व्यक्तींना त्रास जाणवू लागतो. एकतर वातावरणातील बदल आणि दुसरीकडे चुकीची आहार पद्धती यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. म्हणून दमा किंवा अस्थमा असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात (foods) कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे ते पाहुयात. (health asthma patient must eat these foods)

१. मध आणि दालचीनी -

दमा असलेल्या व्यक्तींसाठी (patient) मध आणि दालचीनी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे दमा असलेल्या व्यक्तींनी दिवसातून दोन वेळा मध आणि दालचीनी यांचं सेवन करावं. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी हे चाटण खावं. हे चाटण करण्यासाठी चिमुटभर दालचीनीची पावडर घेऊन ती मधात मिक्स करावी.

हेही वाचा: कोणालाही पाझर फुटेना;आईला JCB मधून रुग्णालयात नेण्याची आली वेळ

२. व्हिटामिन सी -

ज्या पदार्थांमध्ये व्हिटामिन सीचं प्रमाण जास्त आहे अशा पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. यामध्ये संत्री, लिंबू, खरबूज, टरबूज, किवी आणि ब्रोकोली या फळांचं जास्तीत जास्त सेवन करा.

३. आंबवलेले पदार्थ -

आपल्या शरीरात चांगले आणि वाईट असे दोन्ही बॅक्टेरिया असतात. यामध्ये आंबवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील चांगले बॅक्टेरिया व मायक्रोब्सची संख्या वाढते. ज्यामुळे पोटात गॅस होणे, पोटदुखी या समस्या होत नाहीत. म्हणून आहारात आठवड्यातून एकदा इडली, डोसा, अप्पम या पदार्थांचा समावेश करावा.

४. पालेभाज्या -

शरीराच्या योग्य वाढीसाठी पालेभाज्यांचं सेवन आवश्य केलं पाहिजे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, लोह असे अनेक गुणधर्म आहेत. त्यामुळे दम्याचा अॅटॅक वा अन्य तक्रारींचा धोका कमी असतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)