Health Care : उकडलेले अंडे की ऑम्लेट, जाणून घ्या काय आहे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?

उकडलेले अंडे की ऑम्लेट, काय आहे आरोग्यासाठी फायदेशीर?
egg
eggsakal

अनेकजण आपल्या ब्रेकफास्टमध्ये अंडी खाणे पसंत करतात. अंडे चवदार असण्यासोबतच हेल्दी ही आहे. यात व्हिटॅमिन्स, आर्यन आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. अंडी हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामुळेच लोकांना अंडी खायला खूप आवडतात.

दररोज तेच तेच खाणे थोडे कंटाळवाणे असू शकते, म्हणून ते अनेक नवीन रेसिपी ट्राय करून बघतात. यातील सर्वात लोकप्रिय म्हणजे अंड्याचे ऑम्लेट बनवून ते खाणे. काही लोकांना अंडी उकडून त्यावर मसाले टाकून खायला आवडतात. बहुतेक लोक फक्त उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट खातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की उकडलेले अंडे की ऑम्लेट आरोग्यासाठी काय चांगले आहे?

egg
Blue Tea : ग्रीन टी ऐवजी प्या ब्लू टी, डोकेदुखी आणि मासिक पाळीचे दुखणे होईल दूर..

उकडलेल्या अंड्याचे फायदे

जर तुम्ही तुमच्या आहारात उकडलेल्या अंड्याचा समावेश केला तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात.

उकडलेल्या अंड्यांमध्ये ऑम्लेटपेक्षा कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो.

उकडलेल्या अंड्यांमध्ये ऑम्लेटपेक्षा कमी फॅट असते कारण त्यात तेल वापरले जात नाही.

उकडलेल्या अंड्यांमध्ये कोलीन असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी खूप महत्वाचे असते.

ऑम्लेट खाण्याचे फायदे

उकडलेल्या अंड्यांप्रमाणे ऑम्लेट खाण्याचेही अनेक फायदे आहेत.

ऑम्लेटमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या आणि औषधी वनस्पती घालू शकता, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळी चव मिळेल.

ऑम्लेटमध्ये भाज्या आणि इतर घटक मिसळले जात असल्याने ऑम्लेटमधील फायबरचे प्रमाण वाढते आणि जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.

ऑम्लेट बनवताना ॲव्होकॅडो, ऑलिव्ह ऑईल किंवा नट्स इत्यादींचा समावेश केला तर तुम्हाला हेल्दी फॅट्स मिळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

ऑम्लेट की अंडी काय आहे योग्य?

उकडलेले अंडे अथवा ऑम्लेट दोन्ही ही शरीरासाठी अतिशय फायदेशीर मानली जातात. उकडलेल्या अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि कोलीन मोठ्या प्रमाणात असते तर ऑम्लेटमध्ये फायबर, आर्यन, व्हिटामिन सी आणि हेल्दी फॅट मोठ्या प्रमाणत असातात. जर तुम्हाला डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल तर ब्रेकफास्टसाठी उकडलेले अंडे उत्तम पर्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com