Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

हिवाळ्यात आई-वडीलांनी आपल्या नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

हिवाळा हा ऋतू प्रत्येकासाठी आव्हानात्मक असला तरी मात्र, लहान मुलांसाठी हा ऋतू जास्तच धोकादायक असतो. याचं कारण म्हणजे हिवाळ्यात जिवाणू आणि विषाणू झपाट्याने वाढतात आणि नवजात बालकांना याचा सर्वाधिक धोका असतो.

नवजात मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांच्या तुलनेत खूपच कमकुवत असते. त्यामुळे थोडासा जरी निष्काळजीपणा केला तरी बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

हिवाळ्यात साथीचे आजार सतत पसरत असतात, त्यात घरातल्या लहान मुलांची तर विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना कधी सर्दी खोकला होईल, ताप चढेल काही सांगता येत नाही. त्यामुळे याकाळात आपल्या मुलांची काळजी घेणं हे त्यांच्या पालकांपुढे खूप मोठं आव्हान असतं.

नवजात बाळाची तब्बेत आणि त्वचा खूप नाजूक असते. अशा परिस्थितीत आई आणि मूल दोघांचीही हिवाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अशात तुम्ही या पद्धतींचा वापर करू शकतात.

1. बाळाला कड्यांमध्ये नीट गुंडाळा

मुलाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या बाळाला फुल कपडे घाला, आणि कॉटनच्या दुपट्यात व्यवस्थित गुंडाळा. शिवाय बाळाच्या हाता आणि पायासाठी लोकरीचे मोजे घेऊन या. त्याचे कानही झाकून ठेवा.

2. खोलीमध्ये हिटर ठेवा

बाळाला थंडीचा त्रास होऊ नये म्हणून खोलीचं तापमान नॉर्मल ठेवा. शक्य असेल तर त्या खोलीत रूम हिटर बसवा. हिवाळ्यात खोलीचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान असावे. शिवाय तुम्ही खोलीत एक ह्युमिडिफायर बसवू शकतात ज्याने खोलीतली हवा ताजी आणि निरोगी राहील.

Winter Tips : हिवाळ्यात 'अशी' घ्या नवजात बाळाची काळजी; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम
Health Care News: थोडासा व्यायाम केल्यानंतर लगेच थकता? स्टॅमिना वाढवण्यासाठी खा हे पदार्थ

3. त्वचेची काळजी घ्या

बाळाची त्वचा खूप नाजूक असते, हिवाळ्यात तर ती कोरडी आणि खडबडीत होऊ शकते. त्यामुळे बाळाला खाज सुटू शकते किंवा इन्फेक्शन होऊ शकत. त्यापेक्षा बाळाला दिवसातून दोनदा बॉडी लोशन लावा.

4. स्वच्छता ठेवा

हिवाळ्यात बाळाचे आजारांपासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. तुम्ही बाहेरून आले असाल तर बाळाला हात लावण्याआधी हात स्वच्छ धुत जा.

5. स्तनपान करा

बऱ्याचदा आई अशक्त असल्यामुळे बाळाला वरच दूध देण्याचा सल्ला दिला जातो. पण बाळाला रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आईच दूध खूप महत्त्वाचं असतं. आईच दूध त्याला आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com