यांचं कौतुक करावं तितकं कमीच! मुंबईसाठी अहोरात्र झटणाऱ्या १२ NGO

12 ngos in mumbai you should know about
12 ngos in mumbai you should know about

माणूस हा समाजात राहत असतो. इतरांबरोबर तो वावरत असतो. त्यामुळे समाजाप्रती आपली काही कर्तव्य आहेत. ही कर्तव्य पूर्ण करण्याची, समाजाप्रती काही तरी सकारात्मक योगदान देण्याची आपली जबाबदारी आहे. आज अनेक ठिकाणी समाजकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था पाहायला मिळतात. काही जण कोणत्याही संस्थेअंतर्गत काम न करता केवळ आवड म्हणूनही समाजातील गरजु घटकांसाठी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. भारतातही अशा अनेक सेवाभावी संस्था आहेत ज्या गेली कित्येक वर्ष लहान मुले, वृद्ध व्यक्त किंवा प्राण्यांसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. यापैकीच मुंबईतील काही सेवाभावी संस्था म्हणजेच एनजीओ आहेत. या एनजीओ नेमक्या कोणत्या किंवा त्या समाजासाठी नेमकं काय काम करतात हे पाहुयात. या संस्थांविषयी Lets Intern च्या वृत्तात सविस्तर देण्यात आलं आहे.

१. डोर स्टेप स्कूल (Door Step School) -

ही डोर स्टेप स्कूल ही सेवाभावी संस्था असून या संस्थेअंतर्गंत वंचित आणि उपेक्षित मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याचं काम करते. सिग्नल, झोपडपट्टी किंवा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी ही संस्था सातत्याने काम करत आहे.  ३ ते १४ या वयोगटातील मुलं या शाळेत शिक्षण घेतात.

२.  चाइल्ड राइट्स अॅण्ड यू (CRY - Child Rights and You) -
CRY या नावाने ओळखली जाणारी ही संस्था अनेक महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर काम करते. १९७९ मध्ये रिपन्न कपूर यांनी सुरु केलेली ही संस्था आज भारतातील प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहे. यात मुंबई, बंगळुरू, कोलकात्ता, दिल्ली आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे. बालकामगार, कुपोषण, शिक्षण, गरिबी आणि साक्षरता, लहान मुलांची तस्करी आणि लिंगभेद अशा अनेक सामाजिक मुद्द्यांवर ही संस्था काम करते.  ही संस्था 

३. अपने आप वूमन कलेक्टिव्ह  (AAWC – Apne Aap Women’s Collective) -

एएडब्लूसी ही संस्था खासकरुन महिलांसाठी कार्यरत आहे. वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करीमध्ये बळी पडलेल्या स्त्रिया व मुलांचं पूनवर्सन करण्याचं काम ही संस्था करते. मुंबईतील कामाठीपुरा येथील महिलांसाठी व लहान मुलांसाठी ही संस्था विविध उपक्रम राबवते आणि त्यातून त्यांचं विचारपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करते.

४. आसरा (Aasra) -

आसरा ही संस्था मानसिक रुग्णांसाठी खासकरुन काम करते. सोबतच आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं कामही या संस्थेअंतर्गत करण्यात येतं. या संस्थेचे कार्यकर्ते पीडितांची समस्या ऐकून घेतात. त्यानंतर त्यांच मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे या संस्थेच्या कामकाजात आपणदेखील हातभार लावू शकतो. मात्र, त्यासाठी प्रथम सहा महिन्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. 

५.पर्याय (Paryay) -

पर्याय ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असल्याचं सांगण्यात येतं. ही संस्था खासकरुन ग्रामीण भागासाठी काम करते. यात ग्रामीण भागातील महिलांचं सशक्तीकरण, जमीन हक्कावरुन वाद, बालशिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी ही संस्था कार्यरत आहे.

६. आत्मा ( ATMA) -

आत्मा ही संस्था खासकरुन लहान मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे.  लहान मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठी ती प्रयत्न करते. तसंच मुलांना त्यांच्या पायावर उभं करणं हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे.

७. फॅण्ड्री फाऊंडेशन ( Fandry Foundation) -

लोकप्रिय ठरलेल्या फॅण्ड्री या मराठी चित्रपटानंतर या संस्थेची सुरुवात करण्यात आली. ही संस्था आदिवासी पाडा किंवा मागासलेल्या भागातील लोकांसाठी काम करते. या लोकांमध्ये जनजागृती करणं. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं अशी विविध कामे ही संस्था करते. तसंच आदिवासी पाड्यातील मुलांना पुस्तके, कपडे अशा गरजेच्या वस्तूदेखील ही संस्था पुरवते.

८.इंडियन कॅन्सर सोसायटी ( Indian Cancer Society) -
 

ही संस्था कॅन्सर रुग्णांसाठी काम करते. यात कर्करोगग्रस्तांसाठी मदत करणे, त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करणे, कर्करोगाविषयी जनजागृती करणे अशी कामे या संस्थेअंतर्गत केली जातात. 

९. शेल्टर डॉन बॉस्को (Shelter Don Bosco) -

बेघर झालेल्या मुलांसाठी ही संस्था काम करते. या संस्थेअंतर्गत बेघर, छत्र हरवलेल्या मुलांचं संगोपन करते. तसंच त्यांच्या भावी आयुष्यासाठी जडणघडणीचं कामही करते. विशेष म्हणजे समाजात राहत असताना कसं वावरायचं, शिक्षण कसं घ्यायचं, आपली आवड,छंद कसे जोपासायचे हेदेखील ही संस्था मुलांना शिकवते. 

१०. गूंज (Goonj) -

भारतातील टॉप १० एनजीओपैकी ही एक संस्था आहे. अंशू गुप्ता यांनी १९९९ मध्ये या संस्थेची स्थापना केली. ही संस्था पूरग्रस्तांना मदत, समाज विकास अशी विविध कामे करते.

११.  हेल्पएज इंडिया (HelpAge India) -

१९६० साली श्रीसर्वपल्ली राधाकृष्णनन,मि, जॅक्सन कोल आणि सॅमसन डॅनियल यांनी स्थापन केलेली ही संस्था निराधार वृद्ध माणसांसाठी काम करते. या संस्थेअंतर्गत वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणं, पेन्शन योजना, वृद्धांचा होणारा छळ आणि सरकारी मदत यासाठी ती खासकरुन लक्ष देते.

१२. वेल्फेअर फॉर स्ट्रे डॉग्ज्स (Welfare For Stray Dogs) -

भटक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी ही संस्था काम करते. यात भटक्या प्राण्यांचं संरक्षण करणे आणि त्यांची काळजी घेणे हे या संस्थेचे मूळ उद्दिष्ट आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com