esakal | शुगर कंट्रोल करण्यासाठी डायटमध्ये समावेश करा 'या' 4 चहांचा ;Sugar Control Tips
sakal

बोलून बातमी शोधा

tea

शुगर कंट्रोल करण्यासाठी डायटमध्ये समावेश करा 'या' 4 चहांचा

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

वजन कंट्रोल करण्यासाठी जसा डायट प्लॅन केला जातो तसेच अनेक असे आजार आहेत जे कंट्रोल करण्यासाठी डायट करावा लागतो, तो म्हणजे शुगर. हा आजार असणारे लोक खाण्याच्या बाबतीत खूप दक्ष राहतात. दिवसभरात काय खावे काय खाऊ नये याची बऱ्याच जणांची लिस्ट तयार असते. पण कधी-कधी न कळत असे अनेक पदार्थ खाल्ले जातात ज्यामुळे शुगर वाढली जाते. शुगरसारख्या या आजारात जर दिवसभरात डायट कंट्रोल नाही केले तर रक्तामध्ये साखर वाढण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच शुगर असणाऱ्या रुग्णांनी शुगर वाढवणाऱ्या फळांपासून दूर राहिले पाहिजे. जर मधुमेह कंट्रोल केले नाही तर इतर अनेक आजार उद्भवू शकतात.

बऱ्याचदा असं होतं की साखर किंवा गोड पदार्थ नाही खाल्ली म्हणजे शुगर कंट्रोल राहते असा आपला समज असतो. पण नकळत दिवसभरामध्ये आपल्या डायटमध्ये अनेक अशा गोष्टींचा समावेश होतो ज्यामुळे शुगर वाढण्यास मदत होते. शुगर कंट्रोल करण्यासाठी बऱ्याच गोष्टी डायटमध्ये समावेश केल्या पाहिजेत तसेच अनेक गोष्टी टाळल्या पाहिजेत. तुम्ही जर वाढत्या शुगरमुळे त्रस्त असाल तर डायटमध्ये समावेश करा या चार चहांचा. यामुळे तुमची शुगर कंट्रोल राहील आणि इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा फायदा होईल. चला तर जाणून घेऊया कोणत्या चहांचा समावेश करावा.

ग्रीन टी चा करा वापर:

औषधी गुणधर्म असलेली ग्रीन टी वजन कंट्रोल तर करतेच शिवाय शुगर कमी करण्यास ही फायदेशीर ठरते. ग्रीन टीमध्ये असलेल्या अॅटी ऑक्सीडेंट शरीरात इन्फ्लेमेशन आणि सेल डॅमेज करण्याचे काम करतात. त्याचबरोबर इन्सुलिन लेवल ठेवण्यास मदत करते.

दालचिनीचा चहा

आपल्या स्वयंपाक घरात मसाल्यात महत्वाची असणारी दालचिनी चव तर वाढवतेच शिवाय शरीरासाठी पण खूप फायद्याची ठरते. दालचिनीत अॅटीऑक्सीडेंट आणि इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे डायबिटीस आणि इंसुलिन प्रतिरोध करण्यास फायदा होतो. शुगर असणाऱ्या रुग्णांनी नियमित दालचिनीचा चहा घ्यायला हवा.

कॅमोमाईल चहा

या चहा मुळे ब्लड शुगर कंट्रोल राहण्यास मदत होते.या चहात अॅटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे ब्लड शुगर कंट्रोल करतात. या चहामुळे ऑस्टियोपोरोसिस कमी होते.

गुळाचा चहा

गुळाचा चहा शुगर कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामध्ये पॉलीफेनॉल अॅटीऑक्सीडेंट असतात जे ब्लड शुगर लेव्हल ठेवण्यास मदत करता

loading image
go to top