Milk Hing Benefits: पाणी पिऊनही उचकी थांबत नाही? प्या हिंगाचे दुध, एक नाही अनेक आहेत फायदे

हिंगाचा वापर सर्व पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.
milk
milksakal

थोडं विचित्र वाटेल, पण हिंग आणि दूध एकत्र प्यायल्यास अनेक समस्या दूर होतात. हिंग हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक भाग आहे. हे अन्नात वापरले जाते. कोणत्याही गोष्टीत हिंग टाकला की त्याची चव आणि वास अप्रतिम होते. अनेक भाज्या आणि पदार्थ बनवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. मात्र, फार कमी लोकांना हे माहित आहे की दुधात हिंग मिसळल्याने त्याचे फायदे होतात, ते आरोग्यासाठी अमृत बनते. जाणून घेऊया त्याचे 5 जबरदस्त फायदे...

1.पचनक्रिया चांगली होते

हिंगाचे दूध प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. हिंगाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. पचनाशी संबंधित कोणत्याही समस्येवर दुधात हिंग मिसळून पिणे फायदेशीर मानले जाते.

milk
Monsoon Food : पावसाळ्यात 'भुट्टा' खाण्याचे फायदे माहितीयेत

2. मुळव्याधची समस्या दूर होते

जर कोणाला मुळव्याधच्या समस्येने त्रास होत असेल तर त्याने हिंगाचे दूध प्यावे. हे फायदेशीर ठरू शकते. हे मूळव्याधची समस्या कमी करण्याचे काम करते. तसेच वेदनांपासून आराम मिळतो.

3. कान दुखणे थांबते

जर कान दुखत असेल तर दूध आणि हिंग एकत्र करून कानात घालू शकता. यामुळे वेदना कमी होऊ शकतात. शेळीच्या दुधात हिंग मिसळल्याने ते ईयर ड्रॉपसारखे काम करते. त्याचा थेंब रात्री कानात टाका आणि सकाळी कान स्वच्छ करा.

milk
Hair Conditioner : केस धुण्यापूर्वी अर्धा तास केसांना लावा या 3 गोष्टी, महागडं कंडिशनरही पडेल फेल

4. लिव्हरसाठी फायदेशीर

दुधात हिंग मिसळून प्यायल्याने लिव्हरला खूप फायदा होतो. यामुळे लिव्हरशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. हिंगाचे दूध प्यायल्याने शरीर सक्रिय होते आणि अनेक फायदे होतात.

5. उचकीच्या समस्येवर उपाय

काही लोकांना उचकीचा त्रास होतो. उचकी सुरू झाली की थांबायचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत दूध आणि हिंग एकत्र पिणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे उचकीची समस्या दूर होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com