
Health Tips : कोकणातील हे फळ आंब्यालाही टाकते मागे;आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे!
कोकणात फिरण्यासाठी गेलात तर तिथल्या बाजारात मिळणारे कोकम रसाचे कॅन तूम्ही घरी घेऊन आलाच असाल. ते वर्षभर फ्रिजमध्ये राहते आणि शेवटी फेकून दिले जाते. त्यापासून होणारे सरबत क्वचितच पिले जाते. कारण त्याचा इतर कशासाठी उपयोग होतो हे माहितीच नसते.
कोकणात आंब्याऐवजी मिळणारे आणि त्याच्या इतकेच आरोग्यदायी फायदे देणारे दुसरे फळ म्हणजे कोकम होय. कोकम फळाचा आगळ आणि सरबत तयार मिळतो. कोकणातल्या मार्केटमध्ये ते सहज उपलब्ध होतं. कोकमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.
आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमची साल स्तंभन कार्य करते. तर बीयांचे तेल स्तंभन व व्रणरोपक आहे. त्यामूळे त्याच्यापासून आपल्याला मिळणारे फायदेही तितकेच जास्त आहे.(Health)
- कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
- कोकममध्ये पाणी घालून त्याचा कल्क बनवावा व हा कल्क पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.
- कोकमचा कल्क, नारळाचे दूध, कोिथबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.
- अतिसार, संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकमच्या कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.
- अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.
- पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.
- कोकममधील गुणधर्म हृदय गती आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात.
- हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.
- रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
- कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
- उष्माघातापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी आणि शरीराचे तापमान आतून थंड ठेवण्यासाठी कोकम सरबत फायदेशीर आहे. बाहेर पडण्यापूर्वी एक ग्लास कोकम सरबत पिणे फायदेशीर ठरू शकते.
- मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.