Healthy Food : निरोगी मानसिक आरोग्यासाठी करा या पदार्थांचा सेवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Food

Healthy Food : निरोगी मानसिक आरोग्यासाठी करा या पदार्थांचा सेवन

उत्तम आहारामुळे आपले शरीर निरोगी तर राहतेच, पण मात्र, अनेकदा आपल्या आहाराचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही (Mental Health) मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आपण जे काही खातो-पितो त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नैराश्य आणि चिंता याबाबतच्या समस्यादेखील मोठ्या प्रमाणावर आपल्या आहारावर अवलंबून असतात. संतुलित आणि पोषक तत्त्वांनी युक्त आहाराच्या सेवनामुळे तुमच्या शरिरातील ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत करते, त्याचबरोबर तुमची सकारात्मक विचारसरणी वाढविते. आज आम्ही तुम्हाला मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे त्याबाबत सांगणार आहोत.

1. मूड बूस्टर फूड्स

ओमेगा-3 फॅटी अॅसिड जास्त असलेले पदार्थ्यांचे सेवन केल्याने आपला मूड सकारात्मक राहण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही सॅल्मन, ट्युना, ऑयस्टर, चिया सीड्स, अक्रोड, सोयाबीन, फ्लेक्स सीड्स, एवोकॅडो आदी पदार्थांचा समावेश आहारात करावा. याच्या सेवनामुळे नैराश्य, थकवा आदी समस्यांपासून बचाव होण्यास मदत मिळेल.

हेही वाचा: हेल्दी डाएट : जीवनशैली आणि आहार

2. संप्रेरक अन्न

डार्क चॉकलेट, केळी, अंडी, दही, बदाम, विविध प्रकारच्या बेरी इत्यादींचा आहारात समावेश केल्याने शरीरातील आनंदी संप्रेरके सक्रिय होण्यास मदत मिळते. यामुळे तुम्ही मानसिक थकवा आणि भावनिक तणावापासून स्वतःला वाचवू शकता. आनंदी संप्रेरक (Happy Hormones) म्हणजे सेरोटोनिन हा एक न्यूरोट्रांसमीटर आहे जो मूड कंट्रोलj म्हणून काम करतो याचा वापर अँटीडिप्रेसंट औषधांमध्येदेखील केला जातो.

3. लोहयुक्त पदार्थ

लोहाचे सेवनामुळे आपल्या मनःस्थिती आणि मानसिक आरोग्यावरदेखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. शरिरातील लोहाच्या कमतरतेमुळे चिंता, चिडचिड, नैराश्य आणि एकाग्रता कमी होणे, यांसह अनेक मानसिक समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी रोजच्या आहारात पालक, मसूर, ब्रोकोली आणि नट्स आदींचा समावेश केल्यास फायदेशीर ठरू शकते.

(या लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. ई-सकाळ याची पुष्टी करत नाही. या सर्व गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

loading image
go to top