हेल्दी डाएट : जीवनशैली आणि आहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेल्दी डाएट : जीवनशैली आणि आहार

हेल्दी डाएट : जीवनशैली आणि आहार

चुकीची जीवनशैली आणि आजार कसे टाळावेत, याबद्दल माहिती घेऊ. हे आजार तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे बळावतात. आरोग्यदायी सवयी लावून घेतल्यास तुम्ही तुमचे आयुष्यमान उंचावू शकता.

पौष्टिक आहार घ्या

पौष्टिक आहार घेतल्याने हृदयासंबंधीचे आजार, टाइप २ मधुमेह यांपासून तुम्ही दूर राहू शकता. फळे, भाज्या, धान्ये, मांस, फॅट्सचे प्रमाण कमी असलेले दुग्धजन्य पदार्थ असा समतोल आहार कोणत्याही वयात आवश्यक असतो. तुमचे वजन खूप जास्त असल्यास, त्यात केवळ ५ ते ७ टक्के घट केल्यास तुम्ही टाइप २च्या मधुमेहापासून दूर राहू शकता.

दररोज व्यायाम करा

दररोज थोडा व्यायाम केल्यास तुम्ही अनेक आजार टाळू शकता किंवा लांबवू शकता. तुम्ही दर आठवड्याला १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम (उदा. वेगाने चालणे) केल्यास फायदा होतो.

अतिप्रमाणात अल्कोहोल टाळा

मोठ्या कालावधीसाठी अधिक प्रमाणात मद्यपान केल्यास रक्तदाब, अनेक प्रकारचे कर्करोग, हृदयरोग, स्ट्रोक आणि यकृताचा आजार होण्याचा धोका असतो. अधिक प्रमाणात मद्यपान टाळल्यास तुम्ही या धोक्यांपासून दूर राहू शकता.

आरोग्य चाचण्यांत सातत्य

ठरावीक अंतराने आरोग्य चाचण्या केल्याने व तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने आजार वेळीच लक्षात येतात. आजारांवर उपचार झाल्याने गुंतागुंत वाढीस लागत नाही.

पुरेशी झोप घ्या

पुरेशी व शांत झोप न झाल्यास मधुमेह, हृदयविकार, ओबिसिटी व नैराश्यासारखे आजार मागे लागतात. प्रौढांनी दररोज कमीत कमी सात तासांची झोप घ्यावी.

आरोग्यदायी सवयी जोपासा

तुम्ही दैनंदिन आयुष्यात आरोग्यदायी सवयी जोपासल्यास रक्तदाब, ओबिसिटी व त्यातून निर्माण होणार आजार यांपासून दूर राहता येते. त्यासाठी आरोग्यदायी सवयी कोणत्या याची माहिती घ्या व त्या तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्याचा दैनंदिन भाग बनवा.

या सर्व गोष्टी नियमित पाळल्यास तुम्ही शारीरिक व मानसिक आजारांपासून दूर राहू शकाल.

loading image
go to top