
Tips To Improve Relationship : प्रत्येक नात्यात चढउतार येत असतात. सगळ्यांच्याच आयुष्यात सगळंच आलबेल नसतं. पण म्हणून नातं संपत नसतं. कोणतंही नातं टिकवण्यासाठी त्यावर थोडी मेहनत घ्यावी लागते. थोडा वेळ देऊन काळजी घ्यावी लागते. जाणून घेऊया ही नाती Healthy & Happy बनवण्यासाठी टिप्स.
हसतं खेळतं नातं
आयुष्यात हसत-खेळत वातावरण राहिलं तर गोष्टी सुंदर आणि सोप्या वाटू लागतात. नात्याच्या आरोग्यासाठी त्यात हसतं-खेळतं, मजा मस्तीचं वातावरण असणं आवश्यक आहे. हास्य विनोद अनोळखी लोकांनापण आपलंसं बनवतात. हे तर तुमचे आपले लोक आहेत.
कौतुक करा
कौतुक तुम्हाला एक प्रकारची उर्जा देते. त्यामुळे उत्साह बनून राहण्यासाठी कौतुक फार आवश्यक आहे. जोडीदाराचं वेळोवेळी कौतुक कारा. फक्त चांगल्या गोष्टींचच नाही तर चांगल्या प्रयत्नांचंही कौतुक करा. याचा चांगला परिणाम फक्त कामावरच नाही तर नात्यावरहा दिसून येईल.
तुमच्यातले चांगले गुण बघू शकणाऱ्यांसोबत रहा
जसं तुम्ही तुमच्या जोडीदाराचं कौतुक करणं गरजेचं असतं तसंच तुमचंही कौतुक होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लोकांची निवड करतानाही अशीच लोकं निवडा जे सतत नावं न ठेवता चांगल्याला चांगलं म्हणण्यात, कौतुक करण्यात विश्वास ठेवतात. कमतरता शोधणं आणि सतत ऐकून घेणं दोन्हीपण माणसाच्या मनावर नकारात्मक परिणाम करतात. नावं ठेवणं आणि सुधारणा सांगणं यात फरक असतो.
टॉक्सिक नातं आणि लोकांपासून अंतर ठेऊन राहणंच योग्य
जगात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं म्हटलं जातं. त्यामुळे सगळेच लोक चांगले असतात असं नाही. काही लोकांमध्ये खूप नकारात्मकता भरलेली असते. काही नाती फक्त टिकवायची म्हणून सोहत राहणं शक्य नसतं. समोरचा माणूस सुधारेल अशी फार काळ अपेक्षा धरून राहणं शक्य नसतं. त्यामुळे अशा नात्यांपासून लांब जाणं आवश्यक असतं.
सोबत क्वालिटी टाइम घालवा
वेळ हा सगळ्यावर औषध असतो असं म्हणतात ते उगाच नाही. नात्यालाही वेळ दिला तर त्यात सुधारणा होऊ शकतेच. आपलं काम आपलं आयुष्य नाही एक भाग आहे. त्यामुळे नात्यांना त्यांचा वेळ देणं गरजेचं आहे. जोडीदाराला, मुलांना, पालकांना क्वालिटी टाइम द्यायला हवा. त्यावेळी इतर कामं करू नका.
नाही म्हणणं पण गरजेचं आहे
नकार देणं सगळ्यांनाच जमत नाही. जर तुम्ही समोरच्याच्या एखाद्या गोष्टीशी सहमत नसाल तर नाराजीने होकार दिल्याने आतून असंतोषाची भावना कायम असते. त्यातून नात्यात दूरावा वाढू लागतो. त्यामुळे जे मान्य नाही तिथे स्पष्ट नकार देता यायला हवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.