Relationship Tips : ब्रेकअपनंतर आयुष्यात निराश होऊ नका, अशा प्रकारे करा नवीन सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips

Relationship Tips : ब्रेकअपनंतर आयुष्यात निराश होऊ नका, अशा प्रकारे करा नवीन सुरुवात

ब्रेक अप झालं की आयुष्य थांबल्या सारखं वाटू लागतं; पण यश-अपयश हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, जर कधी नात्याबद्दल निराशा वाटली तर घाबरण्याऐवजी पुढे जायचा विचार करावा.प्रेम ही प्रत्येकासाठीच खूप हळवी भावना असते, जेव्हा आपण आपल्या लव्ह पार्टनरसोबत असतो तेव्हा आयुष्य खूप सुंदर वाटायला लागतं, पण जर काही कारणास्तव नातं तुटलं तर आयुष्यातलं सगळंच विस्कटल्यासारखं वाटतं.

हेही वाचा: Relationship Tips : 'या' चॉकलेटने सुधारते पुरुषांची लैंगिक क्षमता

ब्रेकअपला अपयश समजू नका

आपण प्रेमात काही उगाच पडत नाही; एखादा माणूस आपल्या मनाच्या खूप जवळ येतो, आपल्या सहवासात सतत असतो, आपणही त्याला मनातलं सगळ सांगतो, पण अचानक जेव्हा छोट्याश्या कारणाने ते नातं तुटतं, तर आपला हिरमुसड होतो आणि आपल्याला हे खूप मोठं अपयश वाटू शकतं.

हेही वाचा: Relationship Tips : जोडीदारासोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळलाय? अमेरिकन कपल थेरपी करेल मदत

सर्वात आधी, तुम्ही ब्रेकअप झाला आहे हे स्वीकारा आणि दोघांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत हे देखील स्वीकारा. तुमच्या मनात कोणते गिल्ट असेल तर ते काढून टाका आणि या गोष्टी लक्षात ठेवा.

हेही वाचा: Relationship Tips : 'या' ७ औषधांनी कमी होते लैंगिक इच्छा, काय सांगतो अभ्यास?

स्वतःला कधीही कमी लेखू नका

ब्रेकअपचे कारण काहीही असो, परंतु स्वतःला दोष देण थांबवा कारण याने तुम्हाला अस वाटेल की तुम्ही कुठेतरी कमी आहात आणि नातेसंबंध हाताळू शकत नाही. आपल्या नात्यातील कटू आठवणी विसरून पुढे जाण्यातच शहाणपणा आहे, तरच तुम्ही आत्मविश्वासाने आयुष्य जगू शकाल.

हेही वाचा: Relationship Tips : या टिप्स वापरा आणि Made For Each Other म्हणून मिरवा

काही दिवस बाहेर फिरायला जा

जर तुम्ही एका जागीच राहिलात तर तुम्ही त्याच व्यक्तीचा विचार करत राहाल आणि स्वतःला त्रास करून घ्याल त्यापेक्षा जरा काही दिवस दुसरीकडे फिरायला गेलात तर वातावरण बदलणं तर होईलच पण तुम्हालाही जरा बरं वाटेल.