
थोडक्यात
श्रावण महिन्यात हलका आणि पौष्टिक आहार घेतल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते आणि ऊर्जेत भर पडते.
आरोग्यदायी पदार्थ आणि ताज्या फळ-भाज्यांचा समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते.
संतुलित आहारामुळे वजन नियंत्रित राहते व फिटनेस राखण्यास मदत होते.
श्रावण महिना म्हणजे, वर्षा ऋतूतील निसर्गाचा ऊन-पावसाचा खेळ. मनाला आल्हाद देणारा हा "श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे' असे कवीने म्हटलं आहे. मात्र, या आनंददायी श्रावणात थोडी पथ्ये अन् आहाराकडे लक्ष दिले नाही तर पावसाळी वातावरण थोडे दमट, ओलसर असल्याने हवामान आरोग्यास अपायकारक असते. अशा वातावरणात मसालेदार, रुचकर, चमचमीत तळलेले पदार्थ आहारात घेणे टाळावे. केवळ रुचकर नव्हे तर आरोग्यदायी, पचायला हलका आहार घेणे आवश्यक आहे.