

Monsoon Alert: Hepatitis A and E Infections Increase by 20%, Here's How to Stay Safe
sakal
पावसाळ्याच्या पाणी आणि दिवसांत दूषित अन्नपदार्थामुळे पसरणाऱ्या हिपॅटायटिस ए आणि ई या यकृताच्या आजारांनी मुंबईत डोके वर काढले आहे. शहरात या दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना या संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याने सुरक्षित पिण्याचे पाणी व स्वच्छ आहारावर भर देण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.