फिरायला जाण्यासाठी लॉंग विकेंडचा प्लॅन करताय! ही घ्या वर्षभराची लिस्ट

तुम्ही एकूण १९ मिनी सुट्ट्यांची योजना आखू शकता.
 Holiday
HolidaySakal

नवीन वर्ष सुरू झालं की अनेक घरांमध्ये यावर्षी सुट्ट्यांचं प्लॅनिगं कसं करायचं! कुठे फिरायला (Picnic) जायचं? याविषयी चर्चाना सुरूवात होते. कारण ऑफिसच्या (Office) नोटीस बोर्डवर HR ने सुट्ट्यांची यादी लावलेली असते. ती यादी बघून मग अनेकजण सुट्ट्यांचा (Holiday) विचार करायला लागतात. त्यातल्या त्यात अनेकांकडून लॉंग विकेंड (Long Weekend) सुट्ट्यांचा विचार केला जातो. त्यात बायको, मुलं यांच्या शाळा, ऑफिसकडून साधारण कधी सुट्ट्या मिळू शकतात याचाही एक आढावा घेतला जातो. यावर्षी जानेवारी ते डिसेंबरमध्ये आलेल्या सुट्ट्यामधले लॉंग विकेंड असे असतील. तुम्ही याप्रमाणे फिरायला जायचा प्लॅन करू शकता. त्यासाठी तुम्हाला एकूण १९ मिनी सुट्ट्या मिळू शकतात.

holi
holi

जानेवारी (January)

प्रजासत्ताक दिन- यावर्षी २६ जानेवारीला बुधवार असल्याने मोठा विकेंड नाहिये. पण, जर तुम्हाला ही सुट्टीही कुटूंबासमवेत घालवायची असेल तर हा यादिवशी एक दिवस फिरायला जाऊ शकता.

फेब्रुवारी (February) एकही सुट्टी नाही

मार्च (March ) -

महाशिवरात्र — १ मार्च ला मंगळवारी महाशिवरात्र आहे. तुम्हाला जर सुट्ट घ्यायची असेल तर तुम्ही सोमवारी २८ फेब्रुवारीला ती घेऊ शकतात. रविवार, सोमवार, मंगळवार असे तीन दिवस तुम्हाला सुट्ट्यांचे मिळतील. वाटल्यास तुम्ही शनिवारीच फिरायला निघू शकता.

होळी -१८ मार्चला शुक्रवारी होळी आहे. तर १९ -२० मार्चला शनिवार-रविवार आला आहे.

 Holiday
Tourism in India | आपल्या मुलांना अवश्य दाखवा भारतातील ही सुंदर ठिकाणं

एप्रिल (April)

महावीर जयंती/बैसाखी/ डॉ. आंबेडकर जयंती - १४ एप्रिल, गुरूवार

गुड फ्रायडे - १५ एप्रिल, शुक्रवार, तर १६ आणि १७ एप्रिलला शनिवार- रविवार आहे.

मे (May)

ईद-उल-फित्र- ३ मे मंगळवार, १ मेला रविवार आहे. तुम्ही सोमवारी २ मेला सुट्टी घेऊ शकता.

बुद्ध पौर्णिमा- १६ मेला सोमवार आहे. तुम्ही १४ आणि १५ तारखेला शनिवार, रविवार असल्याने तुम्हाला साहजिकच सुट्टी मिळणार आहे.

जून, जुलै- जून, जुलैमध्ये एकही सुट्टी नाही.

 Holiday
४५ हजारात करा बाली,इंडोनेशियाची ट्रिप
Ganpati
Ganpatisakal

ऑगस्ट (August)- या काळात तुम्हाला भरपूर सुट्ट्या प्लॅन करता येऊ शकतात.

मोहरम - ८ ऑगस्टला सोमवारी आहे. तुम्ही शनिवारी ६ ऑगस्टला सुट्टी घेऊ शकता.

रक्षाबंधन - ११ ऑगस्टला गुरूवारी आहे. तुम्ही शुक्रवारी १२ ऑगस्टला सुट्टी घेऊ शकता. कारण १३,१४ ऑगस्टला शनिवार, रविवार आहे.

स्वातंत्र्यदिन - १५ ऑगस्ट, सोमवार, तुम्ही रक्षाबंधनपासून लागून पाच दिवसांची सुट्टी प्लॅन करू शकता.

जन्माष्टमी- १९ ऑगस्ट शुक्रवारी आहे. तुम्ही २०, २१ ऑगस्टच्या शनिवारी, रविवारी सुट्टी घेऊ घेऊ शकता.

गणपती- ३१ ऑगस्ट, बुधवार

सप्टेंबर (September)

गणपती- ३१ ऑगस्टपासून गणपतीला सुरूवात होणार आहे. गुरूवारी, १ सप्टेंबरला दिड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन असेल. २ सप्टेंबरला शुक्रवार आणि ३,४ सप्टेंबरला शनिवार, रविवार आहे. त्याप्रमाणे प्लॅन करून सुट्ट्या ठरवू शकता.

ओणम (restricted holiday) शुक्रवार ८ सप्टेंबरला आहे. तुम्ही ९ सप्टेंबरला सुट्टी घेऊ शकता. कारण १०-११ सप्टेंबरला शनिवार, रविवार आहे.)

 Holiday
दिवाळीत सहकुटुंब फिरायला जाताय... अशी करा घराची सुरक्षा

ऑक्टोबर October

दसरा - ५ ऑक्टोबरला दसरा आहे. यावेळी लॉंग विकेंड नाहीये. पण तुम्हाला सुट्ट्या संपवायच्या असतील तर यादरम्यान ऑफिसमध्ये उपलब्ध असलेल्या सुट्ट्यामझधून घेऊ शकता.

दिवाळी - २४ऑक्टोबर, सोमवारी आहे. तर, २२ आणि २३ ऑक्टोबरला शनिवार, रविवार आहे.

नोव्हेंबर - November

गुरू नानक जयंती - मंगळवारी ८ नोव्हेंबरला आहे. तर, ५ आणि ६ नोव्हेंबरला शनिवार, रविवार आहे. तुम्ही सोमवारी ७ नोव्हेंबरला सुट्टी घेऊ शकता.

डिसेंबरला मोठा विकेंड नाही.

 Holiday
ऑक्टोबरमध्ये करताय फिरायचा प्लॅन? 'इथे' नक्की भेट द्या!

हे चार महिने कमी सुट्ट्या- जून, जुलै, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात मोठे वीकेंड नसतात. परंतु, पण, जर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल आणि एक छोटी सुट्टी घ्यायची असेल, तर पेंडिंग सुट्ट्या वापरून तुम्ही ट्रीपला जाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com