फेअर ॲन्ड लव्हलीच तर झालं आता 'फेअर ॲन्ड हॅण्डसम'च काय... ? 

प्राजक्ता निपसे
Thursday, 9 July 2020

तब्बल ४५ वर्षानंतर फेअर ॲन्ड लव्हलीने  फेअर शब्द काढून टाकला. पण  फेअर ॲन्ड हॅण्डसमच्या नावात कोणता बदल होणार त्यासाठी वाचा हि बातमी 

न्यूजपेपर असो किंवा टीव्ही आपण सर्वानीच लहानपणापासून 'फेअर ॲन्ड लव्हली'ची (Fair & Lovely) जाहिरात पाहत आलो आहोत. आपल्या ओळखीचे मित्रमंडळी किंवा घरातही कुणी ना कुणी तरी ही क्रिम वापरतातच . हा ब्रँड महिला आणि पुरुष या दोघांमध्ये सर्वाधिक पसंतीचं असा होता. हि क्रीम होती हिंदुस्ताने युनिलिव्हर ची.आता त्याच हिंदुस्ता युनिलिव्हरने (Hindustan Unilever) आपल्या सर्वात मोठ्या फेअर ॲन्ड लव्हली ब्रँडचं नाव बदललं आहे. या फेअर अँड लव्हली क्रीम मधील फेअर जाऊन आता ''ग्लो'' हा शब्द आला आहे. आता फेअर ॲन्ड लव्हली असं न म्हणता 'ग्लो ॲन्ड लव्हली' असं म्हणावं लागणार . 

जगभरातील वर्णभेदारून झालेल्या क्रीमच्या नावाच्या टिकेनंतर हिंदुस्ताने युनिलिव्हर ने ४५ वर्षांनी आपल्या सर्वात मोठ्या फेअर ॲन्ड लव्हली ब्रँडचं नाव बदललं आहे. 

मग फेअर ॲन्ड हॅण्डसमच काय होणार ? 
फक्त पुरुषांसाठी बनवण्यात आलेल्या फेअर ॲन्ड हॅण्डसमच या क्रीमच नाव आता ग्लो ॲन्ड हॅण्डसम असं होणार आहे. कंपनीने आपल्या ब्रँडचं रिब्रँडिग करणार असल्याची तशी घोषणा गेल्याच महिन्यात केली होती.

४५ वर्षांपूर्वी म्हणजे १९७५ साली  हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीने ने मार्केटमधे चेहरा गोरं करणारी क्रिम म्हणून फेअर ॲन्ड लव्हली लाँच केली होती.पण फेअर ॲन्ड लव्हलीमधील 'फेअर' या शब्दामुळे गोरेपणा आणि उजळपणावर जास्त भर दिला जातो आहे.म्हणजे  कंपनी अनेकदा रंगभेद करत असल्याची आणि गोरेपणाच्या आकर्षणाचा बिजनेस करत असल्याची टीकाही करण्यात आली .त्यामुळे आता कंपनीने या ब्रँडचं नाव बदललं आहे.

हे वाचा : अजबच... आता कोविड अम्ब्रेला ही आली... ती  तुम्ही पाहिली का ?

गेल्या काही वर्षांपासून फेअरनेस क्रिमवरून वाद सुरू आहेत. फेअरनेस क्रिमच्या अशा जाहिराती, मार्केटिंग करून वर्णभेदाला उघडपणे प्रोत्साह देत असल्याचा आरोप केला जातो.त्यामुळे अशा कंपन्यांवर टिकेची झोड उठली आहे. फेमस अशी फेअर ॲन्ड लव्हली तर कधी पासूनच अशा वादात अडकली होती. 

कोणता आहे वाद ?
अमेरिकेत गेल्या महिन्यात जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूमुळे पुन्हा वर्णभेदाचा वाद उफाळून निघाला आणि ''ब्लॅक लाइव्हज'' हि मुव्हमेंट सुरू झाली. त्यामुळेच जॉन्सन ॲन्ड जॉन्सन कंपनीने आपल्या स्किन व्हाइटनिंग उत्पादनांची विक्री थांबवली. भारतातही त्याचे पडसाद उमटले .हिंदुस्तान युनिलिव्हरच्या फेअर ॲन्ड लव्हली या क्रीम विरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली . त्याला अनेकांनी पाठिंबा दिल्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हरने फेअर ॲन्ड लव्हलीमधील फेअर शब्द काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हे वाचा : हत्तीणीची फॅशनेबल हेअरस्टाईल पाहून तुम्हीही थक्क व्हाल

रीब्रँडिंग​ करण्याचं कारण 
नाव बदलण्याचं स्पष्टीकरण देताना कंपनी म्हणाली कि,सौंदर्य हे फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणापुरतंच मर्यादित नसते.म्हणूनच भविष्यात हिंदुस्थान लिव्हरच्या स्कीन केअर उत्पादनांमध्ये फेअरनेस, व्हाइटनिंग, लाइटनिंग असे शब्दच नसणार.अश्याप्रकारे हिंदुस्तान युनिलिव्हरनंतर L'Oreal या मोठ्या कॉस्मेटिक कंपनीनेही आपल्या स्किन केअर प्रोडक्टमधून व्हाइट, फेअर आणि लाइट हे शब्द हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindustan Unilever Ltd to drop Fair from Fair & Lovely to become more inclusive