Holi 2024 : होळीची राख अंगावर का फासली जाते, काय आहे त्यामागील मान्यता?

होळीच्या राखेचा लहान मुलांना फायदा होतो
Holi 2024 : होळीची राख अंगावर का फासली जाते, काय आहे त्यामागील मान्यता?

Holi 2024 :

चारच दिवसांवर होळीचा सण आला आहे. होळीला पौराणिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. कारण, होळी ही नारायण भक्त प्रल्हादांच्या काळापासून सुरू झाली आहे. राक्षसी होलिकेच्या मांडीवर बसलेले भक्त प्रल्हाद वाचले पण होलिका जळून खाक झाली.

होलिका वाईट शक्तीचे प्रतिक होती तर भक्त प्रल्हाद चांगल्या शक्तीचे. त्यामुळेच होळीत जळालेल्या वाईट शक्तीसाठीच होळी साजरी केली जाते. होळीचा सण दोन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगोत्सव खेळला जातो.

Holi 2024 : होळीची राख अंगावर का फासली जाते, काय आहे त्यामागील मान्यता?
Jalgaon Holi Festival : मुस्लिम कुटुंब वाढवताय होळीचा गोडवा! साखर महागल्याने हार-कंगणच्या दरात वाढ

होळी दिवशी शेणी, लाकडे पेटवून होळी केली जाते. होळीला पुरणपोळी, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून नारळ फोडला जातो. लहान मुलं होळीभोवती बोंब मारत फेऱ्या मारत टमकी वाजवतात. अनेक गावात यादिवशी जत्रा भरते, काही ठिकाणी लठमार सारखा सोहळाही पार पडतो.

होळी कधी पेटवावी?

२४ मार्च रोजी होळी आहे. या दिवशी होळी पेटवली जाते. होळी दहनाचा मुहूर्त हा सकाळी ९ वाजून ५४ मिनिटांनी सुरू होणार असून २५ मार्चला (सोमवारी) दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा शुभ मुहूर्त संपणार आहे.

Holi 2024 : होळीची राख अंगावर का फासली जाते, काय आहे त्यामागील मान्यता?
Holi Festival : रहाड संस्कृतीत ‘मधली होळी’ पुनर्जीवित; रंगप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण

होळीच्या राखेचे महत्त्व

तुम्हाला होळीची राख अंगावर लावल्यास कोणी सांगितले तर तुम्ही नक्कीच नाही म्हणाल. पण त्या राखेचे अनेक फायदे आहे असं कोणी म्हटलं तर आश्चर्य वाटेल ना. हो हे खरं आहे. ही राख अगावर माखण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण त्याविषयीच माहिती घेणार आहोत.

  • होळीच्या दुसऱ्या दिवशी होळी पेटवलेल्या ठिकाणी जाऊन तिथली राख आपल्या संपूर्ण शरीरावर लावावी. असे केल्याने वर्षभर आपल्याला कोणत्याही आजाराची लागण होत नाही.

  • ही राख लावल्याने त्वचेवर आलेले पुरळ, खरूज,त्वचेचे इन्फेक्शन दूर होते.

  • काही लोक ही राख घरी नेऊन ठेवतात. ज्यामुळे घरातून नकारात्मक शक्ती निघून जातात अशी मान्यता आहे.

  • ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो अशा लोकांनी होळीची राख तिजोरीत आणून ठेवावी. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.

  • होळीची राख ताबितमध्ये ठेऊन ते हातात बांधल्याने वाईट शक्ती, नजर लागण्याचे प्रकार होत नाही. विशेषत: लहान मुलांना याचा फायदा होतो.

Holi 2024 : होळीची राख अंगावर का फासली जाते, काय आहे त्यामागील मान्यता?
Holi 2024 : मथुरा-वृंदावनमध्ये साजऱ्या होणाऱ्या रंगोत्सवात सहभागी व्हायचंय? मग, फिरायला जाण्याचा करा प्लॅन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com