Holi 2024
Holi 2024esakal

Holi 2024 : यंदा अनोख्या पद्धतीने साजरी होणारी होळी अनुभवायचीय? मग, दक्षिण भारतातील ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

Holi 2024 : जर तुम्हाला अनोख्या पद्धतीने साजरी होणारी होळी यंदा अनुभवायची असेल तर तुम्ही दक्षिण भारतातील काही ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता.

Holi 2024 : भारतात अनेक प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्र आणि होळी इत्यादी सण मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जातात. होळीचा सण देखील आपल्याकडे मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. होलिका दहन केले जाते. त्यानंतर, रंग खेळले जातात. आता अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे.

यंदा होळीचा सण (Holi 2024) हा २४ आणि २५ मार्चला साजरा केला जाईल. २५ मार्चला होळी खेळली जाईल. मात्र, त्यापूर्वी एक दिवस आधी २४ मार्चला होलिका दहन केले जाईल. भारतातील अनेक राज्यांमध्ये होळी विविध प्रकारे साजरी केली जाते.

जर तुम्हाला अनोख्या पद्धतीने साजरी होणारी होळी अनुभवायची असेल, तर तुम्ही दक्षिण भारतातील काही ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला दक्षिण भारतातील काही अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे होळी अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. कोणती आहेत ही ठिकाणे? चला तर मग जाणून घेऊयात.

Holi 2024
Goa Travel : गोव्यातील 'या' बेटासमोर बालीचे सौंदर्य पडेल फिके, एकदा भेट द्याल तर पुन्हा जाल!

हंपीतील अनोखी होळी

दक्षिण भारतात ही होळीचा मोठा उत्साह पहायला मिळतो. कर्नाटक राज्यातील हंपीमध्ये होळी एखाद्या मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. त्यामुळे, ही अनोखी होळी पाहण्यासाठी आणि साजरी करण्यासाठी देश-विदेशातील लोक या ठिकाणी येतात.

मुळात हंपी हे ऐतिहासिक स्थळांचे शहर असून, या ठिकाणी पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी भेट देताना दिसतात. होळीच्या निमित्ताने हंपीमधील लोक मिरवणूक काढतात, आणि रस्त्यांवर ढोल-नगाड्यांच्या तालावर नाचतात आणि विविध प्रकारची गाणी म्हणतात.

यासोबतच रंग ही खेळले जातात. त्यानंतर, तुंगभद्रा नदीमध्ये आणि हंपीतील इतर उपनद्यांमध्ये स्नान करण्यासाठी लोक जातात. जर तुम्हाला हंपीतील ही अनोखी होळी खेळायची असेल आणि अनुभवायची असेल तर हंपीला जायला काही हरकत नाही. (Holi in Hampi)

केरळमधील होळी

केरळ राज्यात ही होळीचा मोठा उत्साह पहायला मिळतो. या राज्यात होळीचा सण हा मंजुल कुली आणि उक्कुली या नावाने साजरा केला जातो. विशेष म्हणजे या राज्यातील लोक रंगांनी साजरी होणारी होळी खेळत नाहीत. येथील लोक नैसर्गिक पद्धतीने होळीचा सण साजरा करतात. होळीच्या निमित्ताने या ठिकाणी होलिका दहन केले जाते. (Holi in Kerala)

Holi 2024
Holi 2024 : होळीचा सण लय भारी! यंदाच्या वर्षी होळीवर आहे चंद्र ग्रहणाचे सावट?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com