Holi Festival | लग्नानंतरची पहिली होळी जोडीदारासोबत कशी साजरी कराल ? Holi Festival: How will you celebrate the first Holi after marriage with your spouse | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Festival

Holi Festival : लग्नानंतरची पहिली होळी जोडीदारासोबत कशी साजरी कराल ?

मुंबई : होळी हा मुख्यत: रंगांचा सण आहे. होळीच्या सणाला लोक त्यांचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना मिठी मारून त्यांचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात.

यावर्षी असे अनेकजण असतील ज्यांची लग्नानंतरची पहिली होळी असेल. मग ही होळी कशी साजरी करावी, हे पाहू या. (Holi Festival: How will you celebrate the first Holi after marriage with your spouse) हेही वाचा - डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

एखादा विशेष पदार्थ तयार करा

सणाच्या दिवशी घरी अनेक प्रकारचे पदार्थ केले जातात. काही खास प्रकारचे पदार्थ करून तुम्ही तुमच्या पार्टनरला खुश करू शकता. जोडीदाराच्या आवडीचे पदार्थ करा. तुमच्या जोडीदाराला ते खूप आवडेल.

होळीच्या भेटवस्तू द्या

तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंद देण्यासाठी होळीचे गिफ्टही देऊ शकता. त्यांना कपडे किंवा जे काही लागेल ते द्या. जोडीदार खूश होईल. जर तुम्हाला गिफ्टचा पर्याय समजत नसेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाबही देऊ शकता.

एकत्र होळी खेळा

जर पहिली होळी असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत होळी खेळायला जावे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना होळी खेळायला आवडत असेल तर त्यांच्यासोबतही वेळ घालवा.

अन्यथा, होळीला खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळपास साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणालाही जाऊ शकता. हा एक उत्तम पर्याय असेल.

जर तुम्हाला पहिली होळी रोमँटिक पद्धतीने साजरी करायची असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

टॅग्स :HoliRelationship Tips