होळी स्पेशल : हर्बल कलर्स सोबत होळी बनवा खास;  घरच्या टिप्स वापरा; घ्या त्वचेची, केसाची काळजी

holi special skin and hair care tips lifestyle marathi news
holi special skin and hair care tips lifestyle marathi news

कोल्हापूर : प्राचीन काळी रंग बनवण्यासाठी वनस्पती रंग, फूल आणि झाडांचा उपयोग केला जात होता. निश्र्चितच  त्या रसायन पासून बनलेला असल्यामुळे रंग सुरक्षित होते. जे कि आज-काल होळी साजरी करताना असणार रंगांमध्ये नाही. एका रिपोर्टनुसार या रंगांमध्ये रंग, रसायन अभ्रक आणि चमकदार कण शिवाय काही प्रमाणात काच, सोबतच पावडर ग्लास, एसिड आणि क्षार आहेत. पर्यावरणाला तर ते घातक आहेतच शिवाय त्वचा आणि केसांना देखील खूप प्रभावशाली घातक ठरतात. ज्यामुळे स्किन ॲलर्जी होऊ शकते.

केमिकल युक्त कलर एलर्जी, पिंपल्स जास्त वाढतात. अशा कलर चे दुष्परिणाम ही खूप असतात. ते त्वचेला कोरडेपणा आणतात. त्याने लाल पॅच उठून हैराण करून सोडतात. ज्यामुळे स्किन ला कोरडेपणा येतो आणि खाज सुटते. या भागामध्ये ब्युटी एक्सपर्ट शहनाज हुसेन यांनी सांगितलेल्या काही कलर संदर्भात आम्ही माहिती देणार आहोत शिवाय घरामध्ये आपण कशा पद्धतीने कलर तयार करून त्वचेची आणि केसांची काळजी घेणार हे पाहणार आहोत.

प्राकृतिक रंग बनवा


टेसूचे फुल: सिमर टेसूची फुले रात्रभर पाणी मध्ये टाका. होळी खेळण्यासाठी या पाण्याचा उपयोग करा. टेसूचे फुल पिवळा रंगाचा रंग सोडते जो एक हर्बल कलर सारखा असतो.

मेहंदी पावडर: मेहंदी पावडर ला बेसन किंवा मक्याच्या पिठा सोबत मिक्स करू शकता.आणि हिरव्या रंगाप्रमाणे याचा वापर करता येतो.

डाळिंबाची साल: लाल डाळिंबाची साल जिवा पाण्यामध्ये उकळी जाते तेव्हा त्याचा रंग लाल येतो याच पाण्याचा वापर लाल कलर म्हणून  वापरू शकता.

हळदीचा उपयोग: हळदीला कोरड्या किंवा ओल्या रंगामध्ये वापरली जाऊ शकते. कोरडा रंग तयार करायचा असेल तर यामध्ये बेसन मिक्स करता येते. किंवा याला पाण्यामध्ये टाकून उकळत येते. शिवाय रात्रभर जर हळद टाकून ठेवली तर त्याचा कलर पिवळा येतो आपण वापरू शकतो.

लाल चंदन: लाल चंदन पावडर चा वापर कोरड्या किंवा ओला रंग सुद्धा वापरता येतो.

बीट कलर : बीट पाण्यामध्ये उकळा. हाय बीट हे मेजंटा रंग तयार करते. हे पाणी थंड करा आणि वापरा बीट रस काढायचा असेल तर यामध्ये आणखी थोडे पाणी मिक्स करा उपयोग करा.

त्वचा आणि केसांसाठी प्राकृतिक उपचार

तीळ तेलाचा वापर करा : अंगावरील रंग काढण्यासाठी. तसेच मालिश करण्यासाठी सुद्धा वापरले जाते. केवळ  रंग हटवण्यासाठी मदत करते असे नाही तर त्वचेला अतिरिक्त सुरक्षा देते. अंघोळ करताना शरीराला लोफा किंवा कपड्या सोबत हळूहळू रगडून घ्या.

दही आणि हळदीचा प्रयोग : दह्यामध्ये हळद आणि मध मिक्स करा. होळी खेळून झाल्यानंतर काही दिवस रोज चेहऱ्याला, मानेला, हाताला लावून वीस मिनिटाने धुऊन घ्या.  त्वचेला उजळ तर बनतेच शिवाय नरम सुंदर बनवते.

तिळाचे बी : तिळाच्या बियाला थोड कुस्करून डॉक्टर पाण्यामध्ये भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी मिक्स करा आणि चेहरा मान हातांना सगळीकडे लावून घ्या.

एलोवेरा जेल : चेहऱ्याला एलोवेरा जेल किंवा त्याचा रस लावा हात त्वचेला खूप नरम पणा देतो शिवा कोरडेपणाही घालवतो उन्हापासून सुरक्षित ठेवतो.एक चमचा बेसन, एक चमचा दही आणि एक चमचा एलोवेरा जेल घ्या हे तिन्ही मिश्रण मिक्स करा आणि चेहऱ्याला लावून ठेवा. वीस मिनिटाने धुऊन टाका

झेंडूच्या फुलाचा उपयोग : मेरीगोल्ड किंवा झेंडूचे फूल त्वचा, स्कलच्या दाहकते पासून आराम देतो. तीन कप गरम पाण्यामध्ये एक मोठी वाळलेले किंवा ताजे फुल मिसळा. त्याला एक तास पाण्यामध्ये तसंच राहू द्या. हे पाणी गार झाल्यानंतर चेहऱ्याला आणि केसांना लावा. झेंडूचे फूल कुस्करून त्यामध्ये दोन चमच जैतूनचे तेल घाला.त्याला व्यवस्थित मिक्स करा आणि आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये घालून अंघोळ करा.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com