Holiday Calendar | 2022 मध्ये आहेत इतक्या सुट्ट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

holiday calendar

सुट्ट्यांच्या बाबतीतही 2022 हे वर्ष खूप खास असणार आहे.

Holiday Calendar | 2022 मध्ये आहेत इतक्या सुट्ट्या

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

आता नवीन वर्ष सुरू होण्यासाठी केवळ दीड महिना उरला आहे. प्रत्येकाला आशा आहे की 2022 हे वर्ष केवळ आनंदाचेच नाही तर एका वाईट टप्प्याचा शेवटही करेल. सुट्ट्यांच्या बाबतीतही 2022 हे वर्ष खूप खास असणार आहे. 2021 प्रमाणे 2022 मध्येही एकूण 42 सरकारी सुट्ट्या असणार आहेत. या कोणत्या सुट्ट्या आहेत? हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. मित्रांसोबत फिरायला जायचं की कुटुंबासोबत गावाला भेट द्यायची, हे सगळं सुट्टीचं कॅलेंडर पाहून ठरवलं जातं.

2022 मध्ये, 18 सुट्ट्या (गॅझेटेड सुट्ट्या) असतील, तर उर्वरित मर्यादित सुट्ट्या (रिस्ट्रिक्टेड हॉलीडे) असतील. मर्यादित सुट्ट्या म्हणजे त्या सुट्ट्या ज्यामध्ये संस्थेचा मालक किंवा कोणतीही कंपनी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय उघडू शकते. पण साधारणपणे या दिवशी कार्यालये बंद असतात. नववर्षाप्रमाणे, वसंत पंचमी, लोहरी, जन्माष्टमी, रक्षा बंधन किंवा गुरु नानक जयंती या सर्व मर्यादित सुट्ट्या (रिस्ट्रिक्टेड हॉलीडे) मध्ये येतात.

हेही वाचा: शाळांच्या दिवाळीच्या सुट्ट्या वाढणार

2022 मध्ये कोणत्या तारखांना असतील सुट्ट्या

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुट्ट्या- 1 जानेवारी (नवीन वर्ष), 14 जानेवारी (मकर संक्रांती), 14 जानेवारी (पोंगल), 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 5 फेब्रुवारी (वसंत पंचमी), 15 फेब्रुवारी (हजरत अली यांचा जन्मदिवस), 16 फेब्रुवारी (गुरु रविदास जयंती), 26 फेब्रुवारी (महर्षी दयानंद सरस्वती जयंती) आणि 28 फेब्रुवारी (महाशिवरात्री).

मार्च-एप्रिलमधील सुट्ट्या- 17 मार्च (होलिका दहन), 18 मार्च (डोलयात्रा), 20 मार्च (शिवाजी जयंती), 20 मार्च (पारशी नववर्ष), 1 एप्रिल (चैत्र सुखलदी), 13 एप्रिल (बैसाखी), 14 एप्रिल (महावीर जयंती), 15 एप्रिल (गुड फ्रायडे), 17 एप्रिल (इस्टर) आणि 29 एप्रिल (जमात उल विदा).

मे ते ऑगस्टमधील सुट्ट्या - 7 मे (रवींद्रनाथ जन्मदिवस), 15 मे (बुद्ध पौर्णिमा), 30 जून (रथयात्रा), 30 जुलै (मोहरम-आशुरा), 11 ऑगस्ट (रक्षाबंधन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), 18 ऑगस्ट (जन्माष्टमी) आणि 30 ऑगस्ट (गणेश चतुर्थी-विनायक चतुर्थी).

हेही वाचा: शाळांच्या सुट्ट्यांचे नियोजन जारी, वर्षभरात इतके दिवस राहणार सुट्ट्या

सप्टेंबर ते डिसेंबरमधील सुट्ट्या- 7 सप्टेंबर (ओणम), 2 ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), 4 ऑक्टोबर (दसरा), 8 ऑक्टोबर (मिलाद उन-नबी), 9 ऑक्टोबर (महर्षी वाल्मिकी जयंती), 24 ऑक्टोबर (नरक चतुर्दशी), 24 ऑक्टोबर (दीपावली), 25 ऑक्टोबर (गोवर्धन पूजा), 26 ऑक्टोबर (भाई दूज), 30 ऑक्टोबर (छठ पूजा), 24 नोव्हेंबर (गुरु तेग बहादूर शहीद दिवस) आणि 25 डिसेंबर (ख्रिसमस डे).

हेही वाचा: 'भावना दुखावल्यास...'; खुर्शीद यांच्या पुस्तकाविरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली

शनिवार-रविवारी कोणताही सण आला तर समजा तुमची एक सुट्टी वाया जाणार आहे. हा सण इतर कोणत्याही दिवशी असता तर आठवड्यातून एक सुट्टी वाढली असती. 2022 च्या कॅलेंडरवर नजर टाकली तर, यावेळीही शनिवार-रविवारच्या अनेक सुट्ट्या दिल्या आहेत. शनिवारपासूनच 2022 वर्ष सुरू होत आहे. म्हणजेच नवीन वर्ष शनिवारी आल्याने तुमची एक सुट्टी कमी होईल. फेब्रुवारीमध्ये 5 तारखेला वसंत पंचमी आणि 26 फेब्रुवारीला दयानंद सरस्वती जयंती आहे. या दोन्ही तारखा शनिवारी आल्यास दोन सुट्ट्यांचे नुकसान होणार आहे. त्यानंतर रविवार, (ता. 20 मार्च) शिवजयंती तुमची इथेही सुट्टी असेल. 17 एप्रिलला इस्टर संडे आहे आणि या दिवशी रविवारी येतो. यानंतर 15 मे रोजी गुड फ्रायडे आहे आणि हा दिवस देखील रविवारी येईल. शनिवार, 30 जुलै रोजी मोहरम असल्याने सुट्टीचे नुकसान होणार आहे.

यानंतर ऑक्टोबरमध्ये सलग चार सुट्ट्या वाया जाणार आहेत. 2 ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती), 9 ऑक्टोबर (महर्षी वाल्मिकी जयंती) आणि 30 ऑक्टोबर (छठ पूजा) आणि हे सर्व सण शनिवारी आहेत. तर 8 ऑक्टोबर रोजी मिलाद-उन-नबी आहे आणि हा दिवस रविवारी येईल. 24 डिसेंबर रविवारी रोजी नाताळची सुट्टी असेल. अशा प्रकारे वर्षभरात एकूण 12 सुट्ट्या वाया जाणार आहेत.

loading image
go to top