esakal | शाळांच्या सुट्ट्यांचे नियोजन जारी, वर्षभरात इतके दिवस राहणार सुट्ट्या
sakal

बोलून बातमी शोधा

more holidays

शाळांच्या सुट्ट्यांचे नियोजन जारी, वर्षभरात इतके दिवस राहणार सुट्ट्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्हा परिषद (zp school) , नगरपरिषद तसेच खासगी प्राथमिक शाळांच्या सुट्यांचे (school holidays) नियोजन जाहीर करण्यात आले असून वर्षभरात 140 दिवस शाळांना सुट्या राहणार असल्याने या शैक्षणिक सत्रात 225 दिवस शाळा राहणार आहे. (140 school holidays to student in year)

हेही वाचा: कलिंगडाच्या बिया फेकू नका, घरांच्या भेगा बुजविण्यासाठी होणार वापर

विशेष म्हणजे वर्षभरात 52 रविवार येत असून उन्हाळी सुट्या 46 दिवसांच्या राहणार आहेत. तसेही सध्याच्या स्थितीत कोरोनामुळे शाळा सुरू झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळा लॉकडाउनच आहेत. 19 सार्वजनिक सुट्या, भाऊबीजेची एक सुटी, अक्षय तृतीय, ज्येष्ठा गौरी पूजन व सर्वपित्री अमावस्या अशा तीन स्थानिक सुट्या शाळांना राहणार आहेत. या सोबतच स्थानिक सहा सुट्या असून दिवाळीच्या 13 दिवसांच्या सुट्या राहतील. 365 दिवसातून 140 दिवस सुट्या राहणार असल्याने शालेय कामकाजाचे प्रत्यक्ष दिवस 225 राहतील. आरटीई 2009 प्रमाणे एकूण वार्षिक कामकाजाचे तास प्राथमिक स्तर 800 तसेच उच्च प्राथमिक स्तर एक हजार घड्याळी तास आहेत.

स्थानिक सुट्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यातिथी निमित्त 25 ऑक्टोबरला, तर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यातिथी निमित्त 20 डिसेंबरला सुटी राहणार आहे. या सोबतच सभापती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरील एक तर पंचायत समिती क्रीडा महोत्सवा अंतर्गत एक व जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवाची एक अशा दोन सुट्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारातील एक सुटी राहणार आहे.

loading image