Home facial: घरच्या घरी करा 'हे' असे 4 प्रकारचे नॅचरल फेशियल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home facial

Home facial: घरच्या घरी करा 'हे' असे 4 प्रकारचे नॅचरल फेशियल

पावसाळ्यातल्या सरद गरद वातावरणात त्वचेला विशेष देखभालीची गरज असते. त्यामुळे मग आपल्या चेहऱ्याच्या त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी पार्लरमध्ये जावून महागडी फेशियल केली जातात. पण अशा फेशियलचे तात्पुरते फायदे होतात पण चेहऱ्यावरच्या समस्यांवर उपाय मात्र ठरत नाही. पण तुमच्या चेहऱ्यावर जर का मुरुम पुटकुळ्या, डाग या समस्यांवर योग्य उपाय करण्यासाठी चार प्रकारचे फेशिअल घरच्याघरी करता येतात. हे फेशियल करताना साहित्याची जास्त जमवाजमव करण्यासाठी गरज पडत नाही. हे फेशियल करुन तेलकट झालेली त्वचा मस्त तजेलदार, मऊ आणि आकर्षक होते. पावसाळ्यातल्या कुंद वातावरणात आपल्या चेहेऱ्यावरचं तेज वाढवणारे हे फेशिल कोणते आणि ते कसे करायचे याविषयी सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

हेही वाचा: Acne problem: खरचं चेहऱ्यावर लिंबू लावण्याने पुरळांची समस्या कमी होत का?

पपईचा वापर करून घरच्या घरी करा फ्रूट फेशियल:

पपई आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असते. ब्यूटी पार्लरमध्ये जावून फ्रूट फेशियल करतो तसं पपईचा उपयोग करुन घरच्याघरी फ्रूट फेशियल करता येतं. पपईचं फेशियल करण्यासाठी 3-4 चमचे पपईचा गर घ्यावा. त्यात थोडं दही, कोरफडीचा गर आणि लवेंडर ऑइलचे काही थेंब घालवेत. ही पेस्ट चेहेरा आणि मानेस हलक्या हातानं मसाज करत लावावी. 20 मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. पपईचं फेशियल केल्यानं त्वचेचा तेलकटपणा निघून जातो. त्वचेची चमक वाढते. पपई फेशियल केल्यानं चेहेऱ्यावरचे डाग निघून जातात.

कोरफडीचा वापर करून करु शकता फेशियल:

पावसाळ्यात त्वचा नीट स्वच्छ होणं महत्वाचं. त्यासाठी चार नैसर्गिक घटकांचा वापर करुन फेशियल करण्याला महत्व आहे. कोरफडचं फेशियल करण्यासाठी 4 चमचे कोरफड जेल घ्यावं. त्यात थोडा लिंबाचा रस घालून ते चांगलं एकजीव करुन घ्यावं. हे मिश्रण हलक्या हातानं मसाज करत चेहेऱ्यास लावावं. 15 ते 20 मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहेरा रुमालानं टिपून घेतल्यानंतर चेहेऱ्यास माॅश्चरायझर लावावं. कोरफड फेशियल केल्यानं त्वचा उजळते. त्वचेस थंडावा मिळतो. त्वचा माॅश्चराईज होते. चेहेऱ्यावरील डाग निघून जावून त्वचा चमकदार होते.

हेही वाचा: Face Swelling : सकाळी तुमचा चेहरा सुजलेला दिसतोय? मग, त्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या एका क्लिकवर..

चेहऱ्यावरचा तेलगट पणा कमी करण्यासाठी करा मुल्तानी मातीचं फेशियल:

पावसाळ्यात त्वचा तेलकट होते. त्यामुळे मुल्तानी मातीचं फेशियल करणं सर्वात चांगला उपाय आहे. मुल्तानी मातीमुळे त्वचेवरील तेल निर्मिती करणाऱ्या सीबमचं उत्पादन नियंत्रित होतं. त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जातं. मुल्तानी माती किंवा बेंटोनाइट मातीने फेशियल करता येतं. यासाठी 2 चमचे मुल्तानी माती किंवा बेंटोनाइट माती घ्यावी. त्यात गुलाब पाणी घालून मिश्रण एकजीव करावं. हे मिश्रण चेहेऱ्यावर लावावं. 10-15 मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. पावसाळ्यात मुल्तानी मातीचं फेशियल करणं फायदेशीर असलं तरी सारखं सारखं करु नये. कारण यामुळे त्वचा कोरडी पडते.

मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी करा दुधाच्या सायीचं फेशियल:

सायीचा वापर करुन फेशियल करता येतं. यासाठी 4 चमचे ताजी साय आणि त्यात चिमूटभर हळद घ्यावी. साय आणि हळद एकजीव करुन हे मिश्रण चेहेऱ्यास गोलाकार मसाज करत लावावं. 15-20 मिनिटांनी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. पावसाळ्यासाठी सायीचं फेशियल हे उत्तम फेशियल म्हटलं जातं. सायीचं फेशियल केल्यानं चेहेऱ्याची त्वचा खोलवर स्वच्छ होते. त्वचा मुलायम आणि चमकदार होते. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जावून चेहेऱ्याचा रंगही सुधारतो