गृह सुधारणा कर्ज घेताय? योग्य वित्तपुरवठ्यासाठी जाणून घ्या 5 महत्वाच्या गोष्टी

घरमालक स्पर्धात्मक व्याजदर आणि अनुकूल अटींवर उपलब्ध home improvement loan (गृह सुधारणा कर्जासारखे) सोपे वित्तपुरवठा पर्याय निवडू शकतात.
 home improvement loan
home improvement loangoogle

मुंबई : घराचे नूतनीकरण हे एक महाग प्रकरण आहे. यात बचतीचा सगळा पैसा खर्च करावा लागतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी घरमालक स्पर्धात्मक व्याजदर आणि अनुकूल अटींवर उपलब्ध home improvement loan (गृह सुधारणा कर्जासारखे) सोपे वित्तपुरवठा पर्याय निवडू शकतात.

 home improvement loan
गृहकर्ज फेडावे, की गुंतवणूक करावी?

यासारखे क्रेडिट पर्याय घरमालकांना त्यांच्या आवश्यक वित्तपुरवठा गरजा पूर्ण करण्यास आणि कोणत्याही अडचणींशिवाय क्रेडिटची परतफेड करण्यास सक्षम करतात. तरीसुद्धा या कारणासाठी योग्य वित्त पुरवठा पर्याय मिळवा म्हणून प्रथम काही सूचनांचा विचार करणे आवश्यक आहे.

गृह सुधारणा कर्ज घेण्यापूर्वी विचार करावयाचे ५ मुद्दे

१. कर्जाची रक्कम निश्चित करा

कर्जाची आवश्यक रक्कम जाणून घेण्यासाठी कंत्राटदाराशी संपर्क साधावा लागेल आणि नूतनीकरणाच्या खर्चाचा अंदाज घ्यावा लागेल. याशिवाय, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी घरमालक तयार करु शकतात. एकदा याची क्रमवारी निश्चित झाली की आपण स्वत:कडील किती रक्कम खर्च करू शकतो याचा अंदाज येईल.

यानंतर, किती रकमेच्या कर्जासाठी अर्ज करावा याची कल्पना येऊ शकते. याशिवाय, अर्ज करण्यापूर्वी क्रेडिटच्या रकमेची जाणीव असल्याने गरजेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचे टाळण्यास आणि परतफेडीचा भार कमी करण्यास मदत होऊ शकते. या संदर्भात पर्सनल लोन कॅल्क्युलेटरचा वापर करुन त्यांना परतफेडीचा किती भार पडेल याची एकूण कल्पना मिळवू शकतात.

 home improvement loan
नियमित कर्ज परतफेड

२. पात्रता मापदंड घटक आणि आवश्यक कागदपत्रे

कर्जाची रक्कम निश्चित केल्यानंतर, एखाद्याने पात्रता निकष आणि वित्तपुरवठा पर्याय याकडे जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा विचार केला पाहिजे. यामध्ये अर्जदाराचे वय, क्रेडिट स्कोअर, मासिक उत्पन्न इ.चा समावेश आहे. मात्र, या पात्रता आवश्यकता पूर्ण करणे एखाद्याला आव्हानात्मक होत असेल तर तो/ती नेहमीच वैयक्तिक कर्जासारख्या पर्यायाची निवड करु शकतात.

३. योग्य कागदपत्रांची जुळवणी करा

पात्रता मापदंडाची पूर्तता करण्याव्यतिरिक्त एखाद्याने आवश्यक कागदपत्रे सादर करणेही आवश्यक आहे. यामध्ये केवायसी कागदपत्रे, उत्पन्नाचा पुरावा, रोजगार स्थिती इ.चा समावेश आहे. म्हणून, त्रास-मुक्त दस्तऐवजीकरण प्रक्रिया करुन देणार्‍या वित्तपुरवठादाराचा शोध घेणे अत्यावश्यक आहे.

४. कर्जाची मुदत आणि ईएमआय काढा

गृह नूतनीकरण किंवा या कारणासाठी कोणत्याही वित्तपुरवठा पर्यायांसाठी अर्ज करण्यापूर्वी कर्जाची मुदत आणि ईएमआय शोधून समजून घेणे आवश्यक आहे. अघाडीचे वित्तपुरवठादार विविध परतफेड पर्यायांसासह ५ वर्षांपर्यंतचा परतफेड कालावधी देऊ करतात.

शिवाय इथे लक्षात घेण्यायोग्य मुद्दा असा की दीर्घ कालावधीमुळे ईएमआय कमी होईल आणि कमी कालावधीने ईएमआय वाढेल. काही ऑनलाईन कॅल्क्युलेटर्स कर्जदारांना त्यांच्या योग्यतेनुसार कर्जाची मुदत आणि हप्त्याची रक्कम निवडण्यास मदत करु शकतात. याव्यतिरिक्त, कर्जदार जर वैयक्तिक कर्जासारख्या पर्यायाचा विचार करत असेल तर तो या उद्देशासाठी समर्पित पर्सनल लोन कॅल्क्युलेटरची मदत घेऊ शकतो.

या ऑनलाईन उपकरणाची मदत घेतल्यास कर्जदारांना त्यांच्या वैयक्तिक कर्जाच्या ईएमआय परतफेडीचे उत्तम नियोजन करण्यास मदत होऊ शकते.

५. बाजारपेठेचे पूर्ण संशोधन करा

शेवटचे पण महत्त्वाचे, कोणत्याही क्रेडिट सुविधेसाठी अर्ज करण्यापूर्वी बाजारपेठेचे संशोधन करणे आवश्यक आहे. गृह नूतनीकरण कर्जासाठीही असेच म्हणता येईल.

बाजारपेठ संशोधनाचा एक भाग म्हणून योग्य कर्जाची ऑफर शोधण्यासाठी काही आवश्यक मुद्द्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे –

• व्याजदर

• संबद्ध शुल्क

• कर्जाच्या अटी व शर्ती

• परतफेड पर्याय

• कर्ज प्रक्रिया आणि वितरण वेळ

याशिवाय, हे लक्षात घ्यायला हवे की हे मुद्दे सगळीकडे सारखेच नसतात, ते वित्त पुरवठादारानुसार बदलत जातात. अशाप्रकारे व्यापक संशोधन केल्यास कर्जदारांना ते शोधत असलेली कर्जाची ऑफर मिळवण्यात आणि त्यांच्या घराच्या नूतनीकरणाचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल.

त्यामुळे हे मुद्दे लक्षात ठेवल्याने कर्जदरांना त्यांच्या गरजा पूर्ण करणारे गृह नूतनीकरण कर्ज शोधण्यास मदत होऊ शकते.

दुसरीकडे, एखादी व्यक्ती जर या विशिष्ट आर्थिक उत्पादनासाठी पात्र ठरत नसेल तर तो/ती सर्वोत्तम वैयक्तिक कर्ज पर्यायाची निवड करु शकते. हा एक असुरक्षित वित्तपुरवठा पर्याय आहे ज्याला वापराचे बंधन नाही. त्यामुळे घराच्या नूतनीकरणासाठी याचा वापर करता येईल.

याशिवाय, वैयक्तिक कर्ज इतर सुविधा मिळवून देते.

• स्पर्धात्मक व्याजदर

• परतफेडीची लवचिकता

• कर्ज प्रक्रिया व वितरणासाठी कमीत कमी वेळ

याव्यतिरिक्त, बजाज फिनसर्व्हसारखे आघाडीचे वित्त पुरवठादार कर्ज अर्ज प्रक्रिया सुलभ करतात आणि वेळेची बचत करतात अशा पूर्व-मंजूर ऑफरसारख्या सुविधा देतात. शिवाय, या ऑफर Bajaj Finserv Personal Loan (वैयक्तिक कर्जाव्यतिरिक्त) व्यवसाय कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी आर्थिक उत्पादनांना लागू आहेत. संभाव्य कर्जदार स्वतःचे आवश्यक संपर्क तपशील सादर करुन आपल्या पूर्व-मंजूर ऑफर तपासू शकतात.

मालमत्तेची नियमित देखभाल करणे अत्यावश्यक असल्याने आणि या प्रक्रियेत बराच खर्च येत असल्याने वित्त पुरवठा व्यवस्थित असणे आवश्यक आहे. शिवाय, आवश्यक आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी कोणीही गृह सुधारणा कर्जाची मदत घेऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com