हिवाळा ऋतू सर्वांनाच आवडतो. कारण, या दिवसात हवेतील गारवा निसर्गाला एक नवं रूप देतो. त्यामुळे, या दिवसात लोक फिरण्यासाठी बाहेर पडतात. पण दाट धुके आणि वातावरणातील गारवा यामुळे प्रकृती बिघडत आहे. धुर अन् थंडीमुळे अनेक लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत.
सध्याच्या वातावरणात पसरलेल्या वायू प्रदूषणामुळे मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. हवेतील प्रदूषित कणांमुळे डोळ्यात जळजळ, त्वचा रोग, घसा खवखवणे, शिवाय श्वास घेण्यास त्रास होत असल्याने फुफ्फुसावर दाब पडत आहे. ही विषारी हवा दम्याच्या रुग्णांसाठी सर्वाधिक घातक ठरत आहे. त्यामुळे बाहेर पडण्यापूर्वी मास्क वापरण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत.