esakal | काखेतल्या घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय

बोलून बातमी शोधा

काखेतल्या घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय
काखेतल्या घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय
sakal_logo
By
शर्वरी जोशी

उन्हाळा सुरु झाला की अनेक शारीरिक तक्रारी व समस्या डोकं वर काढू लागतात. यात सगळ्यात त्रासदायक ठरणारा समस्या म्हणजे सतत येणारा घाम. दुपारी कडक ऊन पडायला लागलं की घाम येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे सतत घामाने ओलं चिंब होणारा अंग आणि त्यामुळे येणारा घामाचा वास नकोसा होतो. बऱ्याच वेळा मान, गळा, काख अशा ठिकाणी घाम जास्त येतो. त्यातच काखेत म्हणजे अंडर आर्म्समधील घामाचा तीव्र दर्प येतो. म्हणूनच हा तीव्र दर्प, वास कमी करणारे घरगुती उपाय कोणते ते पाहुयात.

१. सैंधव मीठाचा वापर -

सैंधव मीठाच्या वापरामुळे घामाचा दुर्गंध कमी होतो. त्यामुळे घामामुळे जर प्रचंड दुर्गंधी येत असेल तर कोमट पाण्यात एक चमचा सैंधव मीठ टाकावं व त्या पाण्याने अंघोळ करावी. हे एक प्रकारचं नैसर्गिंक क्लिजिंग आहे.

२. अॅपल साइडर व्हिनेगर -

एक कप अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये आर्धा कप पाणी मिक्स करा. त्यानंतर हे पाणी दररोज अंडरआर्म्समध्ये स्प्रे प्रमाणे मारा आणि त्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करा.

३. बटाट्याचा वापर -

बटाट्याचे लहान लहान तुकडे करुन अर्धा तास काखेमध्ये रगडा त्यानंतर गार पाण्याने हात धुवून घ्या. यामुळे अंडर आर्म्समधील घामाचा वास जाईल सोबतच काखेतील काळपटपणाही दूर होईल.

४. बेकिंग सोडा आणि लिंबू -

२ चमचे बेकिंग आणि १ चमचा लिंबाचा रस मिक्स करुन हे मिश्रण काखेत लावा. त्यानंतर १० मिनिटांनी हात स्वच्छ धुवा.

५. टोमॅटोचा रस -

टोमॅटोच्या रसामध्ये लिंबाचा रस मिक्स करुन हे मिश्रण १० मिनिटे काखेत लावा. त्यानंतर थंड पाण्याने हात धुवून घ्या.