homemade scrub
homemade scrub

घरगुती स्क्रब ठरू शकतो चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

Published on

तुम्ही स्वतःच्या त्वचेची काळजी घेत असाल, तर तुम्हाला कळेल की ब्लॅकहेड्स चेहऱ्यावर सहन करणे किती अवघड असते. त्यांचा योग्य पद्धतीने इलाज केला नाहीतर ती काढणे कठीण होऊन जाते. तसे पाहिले तर बाजारात अनेक प्रकारचे नोज स्ट्रिप्स उपलब्ध आहेत. मात्र आम्ही येथे तुम्हाला एक डिआयवाय फेस स्क्रबविषयी सांगणार आहोत जो ब्लॅकहेड्स काढण्यावर इतरांच्या तुलनेत स्वस्त सहज पर्याय ठरेल. हे स्क्रब बनवण्याचे सर्व साहित्य तुमच्या स्वयंपाक घरातच मिळून जाईल. आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप ती कशी बनवावी व त्याच्या वापराविषयी सांगणार आहोत..

साहित्य 
- ओटमिल्स - १/२ कप
- बेकिंग सोडा - १ टीस्पून 
- लिंबूचे रस - एक टेबलस्पून 

कृती
फेस स्क्रब - एका मिक्सिंग वाटीत ओटमिल टाका. जर त्याचे दाणे मोठे असेल, तर ती चांगल्या प्रकारे बारीक करुन घ्या. ओटमिल्स त्वचेला हळुवारपणे एक्सफाॅलिएट करण्यात मदत करण्याबरोबरच पोर्सला स्वच्छ करते आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेण्याचेही काम करते. ओटमिल्समध्ये बेकिंग सोड टाका. बेकिंग सोडा पोर्सला स्वच्छ करणे, त्वचेची पीएच प्रमाण संतुलित बनवणे आणि मृतत्वचेच्या पेशी हटविण्यात मदत करते. आता लिंबाचे रस टाका. लिंबातील नैसर्गिक अंबटपणा जो त्वचेच्या डीप क्लीनिंग करण्याबरोबरच पोर्समध्ये जमा घाण हटवते. यात असलेल्या जीवनसत्त्व-क मुळे त्वचा खुलते. चांगला परिणाम मिळविण्यासाठी सर्व साहित्य चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या. 

वापरण्याची पद्धत
१. सर्वप्रथम त्वचा स्वच्छ करा. पोर्स खोलण्यासाठी वाफ घेणे जास्त फायद्याचे ठरेल.
२. स्क्रब लावण्यापूर्वी त्वचा नरम असावी.
३. स्क्रब चेहऱ्यावर साधारण एका मिनिटापर्यंत सर्क्युलर मोशनमध्ये लावा. हळूहळू एक्सफाॅलिएट करा. ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स अधिक असेल तिथे अधिक ध्यान द्या. जसे की नाक आणि हनुवट.
४. एक मिनिटानंतर ते धुवून घे आणि सूखी द्या. स्क्रब केल्यानंतर सीरम आणि माॅश्चरायझर लावण्याचे विसरु नका. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com